घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक, ५० हजाराचा ऐवज जप्त

प्रल्हाद कांबळे
Thursday, 22 October 2020

इस्लापूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या चोरीतील तीन मोबाइल, चार हजार रुपयांची रोकड, दोन तोळे सोन्याचे दागिने असा ४७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे

नांदेड : इस्लापूर व परिसरात घरफोड्या करुन नागरिकांची व पोलिसांची झोप उडवून देणाऱ्या चोरट्यांची टोळी इस्लापूर (ता. किनवट) पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व चोरीला गेलेले साहित्य जप्त केले. अटक केलेल्या सहा जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. 

इस्लापूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या चोरीतील तीन मोबाइल, चार हजार रुपयांची रोकड, दोन तोळे सोन्याचे दागिने असा ४७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे. इस्लापूर पोलिस ठाण्यांतर्गत शहरातील दोन घरात घरफोडी झाली होती. ता. ३० मार्च रोजी कुलूप तोडून चोरट्यांनी लंपास केला होता. तीन मोबाइल हँडसेट, चार हजार रुपये रोख, दोन तोळे सोन्याचे दागिने असा ४७ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

हेही वाचा -  उस्मानाबाद : सामुहिक अत्याचार पीडित मुलगी देतेय मुत्यूशी झुंज, उपचारासाठी हवेत पैसे -

इस्लापूर पोलिस ठाण्यात होता गुन्हा दाखल 

या चोरीप्रकरणी इस्लापूर येथील ग्रामपंचायत सदस्य मनोज विठ्ठलराव राठोड यांनी ता. ३१ मार्च रोजी इस्लापूर पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चोरटे अज्ञात असल्याने पोलिसांसमोर त्या चोरींचा तपास लावणे कठीण काम होते. मात्र फौजदार किशन कांदे यांनी या घरफोडीचा तपास सुरुच ठेवला. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व सायबर सेलच्या मदतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, उपनिरीक्षक किशन कांदे यांनी आपले सहकारी दारासिंग राठोड, अंकुश लुंगारे, पांडुरंग जिनेवाड, रामप्रभु राठोड यांना सोबत घेऊन तपासाची गती वाढली.

येथे क्लिक कराकुख्यात विक्की चव्हाणचा मुख्य मारेकरी कैलास बिगानियासह तिघांना अटक -

सहा जणांना न्यायालयीन कोठडी

ता. १३ ऑक्टोंबर रोजी अर्धापूर तालुक्यातील लहान येथून आरोपी संघरत्न ऊर्फ बाळू रमेश पाणबुडे (वय २२), राजे शहाजी भोसले (वय २६) आणि पृथ्वीराज उत्तमराव सावंत या तीन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला एक मोबाईल हँडसेट, अंदाजे आठ ग्रॅम सोन्याची चैन जप्त केली. त्यानंतर ता. १८ ऑक्टोंबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील बोरगाव तांडा, सोनारी पार्टी येथून गब्बरसिंग सिताराम राठोड (वय ५७), निलेश गब्बरसिंग राठोड (वय २५) आणि बंडेकर सिताराम राठोड (वय ५१) यांना अटक केली. या सराईत चोरट्यांकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला. पोलिस कोठडीनंतर त्यांना गुरुवारी (ता. २२) न्यायालयीन कोठडी मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused arrested for burglary, Rs 50 thousand seized nanded news