आदिलाबाद- नांदेड इंटरसिटी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत; खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ता. १ एप्रिलपासून ही गाडी  मुदखेड, भोकर, हदगाव रोड, हिमायतनगर, सहस्रकुंड, बोधडी, किनवट आणि आदिलाबाद या दरम्यान धावणार आहे.

आदिलाबाद- नांदेड इंटरसिटी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत; खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश 

नांदेड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली नांदेड- किनवट- आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वे व्यवस्थापक गजानन माल्ल्या व नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपींदर सिंग यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीस दुजोरा दिला आहे. ता. १ एप्रिलपासून ही गाडी  मुदखेड, भोकर, हदगाव रोड, हिमायतनगर, सहस्रकुंड, बोधडी, किनवट आणि आदिलाबाद या दरम्यान धावणार आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच सार्वजनिक दळणवळण व्यवस्था बंद करण्यात आली होती. देशाची लाईफलाईन असलेली रेल्वे सेवा सुद्धा यामुळे प्रभावित झाली होती. तब्बल सहा-सात महिन्यानंतर सर्व सेवा पूर्वपदावर येत असताना देशाच्या प्रादेशिक भागातील वाहतूक व दळणवळण व्यवस्था सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यातील नांदेड- किनवट- आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस असून ही गाडी हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट, माहूर तालुक्याशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे ही इंटरसिटी एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याची मागणी झाल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत दक्षिण मध्य रेल्वे व्यवस्थापक गजानन माल्ल्या व नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपींदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क करुन  मागणी केली व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली त्यानंतर रेल्वे ने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ मागणी मंजूर केली. 

हेही वाचा जिंतूर : वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यास कोरोनाची लागण; वर्षभरात चार अधिकारी, सहा कर्मचारी पॉझिटिव्ह

ता. १ एप्रिलपासून ही रेल्वे सेवा पूर्ववत सुरु होणार आहे. आदीलाबाद, किनवट, बोधडी, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, हदगाव रोड, भोकर, मुदखेड या स्थानकावर ही गाडी थांबणार आहे. आदिलाबाद येथील सकाळी 8 वाजता निघून दुपारी सकाळी 11: 55 वाजता नांदेड येथे पोहचेल तर दुपारी 3 वाजता नांदेड येथून निघून सायंकाळी 6: 55  वाजता आदिलाबाद येथे पोहचेल. या गाडीमुळे बंद झालेली दळणवळण सेवा पूर्ववत होण्यास मोठी मदत होणार आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट, माहूर तालुके या गाडीमुळे खूप मोठ्या प्रमाणत प्रभावित झालेले आहेत. आदीलाबाद आणि नांदेडकडे जाणारे नौकरदार आणि व्यापारी वर्गांना याचा लाभ होणार आहे. 

Web Title: Adilabad Nanded Intercity Again Passenger Service Success Pursuit Mp Hemant Patil Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..