Nanded : तहसील कार्यालयाचा अजब कारभार; आरक्षणावर न लढलेल्या सदस्याला केले अपात्र

मात्र दोन वर्षे सतत पुरावे सादर करुनही अंतीम निर्णय मात्र अपात्रतेचाच देण्यात आला
nanded
nandedsakal

माळाकोळी : खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याला जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून अपात्र ठरवल्याचा अजब आदेश लोहा तहसील कार्यालयाने काढला आहे. आणि विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून नोटीस देऊन पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले; मात्र दोन वर्षे सतत पुरावे सादर करुनही अंतीम निर्णय मात्र अपात्रतेचाच देण्यात आला.

निवडणूकच आरक्षीत प्रवर्गातून लढवलीच नाही अन् दोन वर्षे हेरींगसाठी विनाकारण तहसील कार्यालय व जिल्हधिकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागले. महसुल प्रशासनातील निवडणूक विभाग कायम उलट सुलट कारभाराने चर्चेत राहतो. यामुळे ग्रामपंचायत सदस्य केशवराव तिडके यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

तीन टर्म ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय असलेले केशवराव तिडके यांनी तीनही निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून लढवल्या आहेत. आणि त्यांनाच जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणामुळे अपात्र व्हावे लागले ही बाब निवडणूक विभाग तहसील कार्यालय लोहा यांच्या गलथाण कारभाराची साक्ष देणारी आहे.

nanded
Nanded : नांदेड महापालिकेची कर वसुलीसाठी धडक कारवाई; दुकाने, कार्यालये सील; नळ, मलनिःसारण जोडणी खंडित

याशिवाय ईतरही अनेक सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर करुनही त्यांना अपात्र घोषीत केल्यामुळे तहसील कार्यालय लोहा येथे या सदस्यांनी धाव घेऊन संबंधित विभागाच्या नायब तहसीलदार यांना जाब विचारला. असे प्रकार निदर्शनास आल्यामुळे दोन वर्षे हेरींग ठेवून आपण कोणती माहिती गोळा केली व त्यांचे काय केले असा सवाल या सदस्यांनी उपस्थित केला आहे.

माळाकोळी येथील ग्रामपंचायत सदस्य केशवराव तिडके यांना (ता.१८) मे रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे कारणामुळे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले. आदेश प्राप्त होताच केशवराव तिडके यांना आश्चर्य वाटले.

nanded
Nanded Fraud : लाख रोख उकळले : गुन्हा दाखल होताच खंडणीबहाद्दर अटकेत

आपण निवडणूकच आरक्षीत प्रवर्गातून लढवली नाही अन् अपात्र कसे याबाबत त्यांनी दोन वर्षांपासून तहसील कार्यालय लोहा व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आवश्यक पुरावेही सादर केले होते. तरीही अंतीम निर्णय अपात्र म्हणूनच घेण्यात आला मग झालेल्या हेरींग व सादर केलेले पुरावे एवढा सोपस्कार फक्त मनस्तापासाठी व वेळेचा अपव्यय करण्यासाठी होता का? असा संतप्त सवाल केशवराव तिडके यांनी उपस्थित केला आहे.

मला दोन वर्षांपासून तहसील कार्यालय लोहा व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे यासंदर्भात बोलावून पुरावे मागविण्यात आले होते. मी निवडणूकच आरक्षीत प्रवर्गातून लढवली नाही तर जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रश्नच उरत नाही ही बाब वेळोवेळी त्यांच्या निदर्शनास आणून देऊनही शेवटी अपात्र घोषीत केले गेले. ही प्रक्रिया निवडणूक विभागाच्या चुकीमुळे घडली; मात्र मला यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

- केशवराव तिडके ग्रामपंचायत सदस्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com