उगवणक्षमता तपासून घरचे बियाणे पेरा; कृषीतज्ज्ञांचा सल्ला

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन
Agronomists advice house soybean seeds use after test to Sowing
Agronomists advice house soybean seeds use after test to Sowingsakal

नांदेड : कमी खर्चाचे व शाश्वत उत्पादन घेण्यासाठी सोयाबीन उत्पादकांनी घरचे बियाणे वापरणे अधिक फायद्याचे ठरेल. फक्त त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

कृषी सेवा केंद्रांमधून विकत घेतलेल्या प्रमाणित बियांपासून उत्पदीत होणारे बियाणे सतत तीन वर्षापर्यंत वापता येते. सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्के एवढे असावे लागत असले तरी प्रत्यक्षात गेल्या दोन-तीन वर्षात सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा जास्त धालेले आहे. दुपटीहून ज्यादा बियाणे शेतकरी खरत करत आहेत. या उलट प्रमाणित बियाण्यांपासून तयार झालेल्या बियाण्याची उगवण शक्ती तपासून बियाण्याची गरज घरच्या उत्पादनातून भागविल्यास बाजारातील बियाणे मिळण्यासाठी करावी लागणारी पायपीट व बाजारातील बियाणे उगवण झाले नसल्यामुळे होणारा मनस्तापसुद्धा टाळता येऊ शकतो. बियाणेवील खर्च कमी होवून उत्पादन खर्चातही बचत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून घरच्या बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करावा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

अशी करा उगवण क्षमता तपासणी

घरच्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढा. सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेवून स्वच्छ धुवून घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा. काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर तुकड्यावर ओळीत ठेवून त्यांचे तीन नमुने तयार करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यांवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी टाकावे.

गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गोलगुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. त्यावर अधुनमधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. सहा ते सात दिवसानंतर ही गोलगुंडाळी जमिनीवर पसरून उघडावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून त्याची मोजणी करावी. तिन्ही गुंडाळीची सरासरी काढून १०० दाण्यापैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे कोंब आलेले असतील तर, बियाणे बाजारातील बियाणेसारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे आणि शिफारसीप्रमाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण झालेल्या बियाण्याची टक्केवारी ७० पेक्षा कमी असेल तर, एकरी बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. मात्र ५० टक्केपेक्षा कमी उगवण शक्ती असल्यास घरचे बियाणे न वापरता प्रमाणित बियाणे खरेदी करावे.

अशी करा बीजप्रक्रिया

रायझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम, १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशी रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी व ७०० ते १०० मिलीमिटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्लाही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com