सहा ठिकाणी छापे टाकून दारू जप्त

पोलिसांची कारवाई़, १३ हजाराचा ऐवज जप्त
Alchohol Seized
Alchohol SeizedSakal

नांदेड - विनापरवाना आणि बेकायदेशिररि्त्या अवैध दारूची साठवणुक करून नंतर ज्यादा दराने तिची विक्री करणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या वतीने कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यात सहा ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून जवळपास १३ हजाराची अवैध दारू जप्त केली आहे. या बाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतवारा भागात हॉटेल आजम समोरील रस्त्यावर एकाकडे एक हजार ४४० रुपांची देशी दारू सापडली. पोलिसांनी ती जप्त केली असून याबाबत पोलिस जमादार एकनाथ मोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत भोकर तालुक्यात सुधा नदीच्या जवळ एकाकडे दीड हजाराची देशी दारू सापडली. याबाबत पोलिस जमादार बालाजी लक्षटवार यांन दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत मुदखेड शहरातील नवी आबादी येथे एकाकडे दीड हजाराची देशी दारू सापडली. ती जप्त करण्यात आली असून याबाबत पोलीस जमादार महेंद्र कवठेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिवळणी (ता. माहूर) येथे एकाकडे तीन हजार तीनशे रुपयांची दारू सापडली. याबाबत सहायक फौजदार रामचंद्र दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस जमादार जाधव करत आहेत.

किनवट शहरातील शनिवार पेठ येथील एकाकडे दोन हजार रुपयांची गावठी दारू सापडली. याबाबत पोलिस जमादार आप्पाराव राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देगलूर शहराजवळ खानापूर चौकात एकाकडे दोन हजार ८८० रूपयांची देशी दारू सापडली. पोलिसांनी ती जप्त केली असून याबाबत फौजदार रवी मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार केंद्रे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com