esakal | आंबेडकरवादी समाजाने अभ्यास उपक्रमाने घराघरात जयंती साजरी करावी- दीपक कदम 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आंबेडकरवादी समाज हा विज्ञानिष्ठ व कायदाचे पालन करणारा समजा आहे. रस्त्यावर येऊन जयंती साजरी करुन कोरोनाच्या काळात समाजाचा जीव धोक्यात घालू नये, शिक्षण आणि अभ्यासातून समाज प्रगती होणार आहे.

आंबेडकरवादी समाजाने अभ्यास उपक्रमाने घराघरात जयंती साजरी करावी- दीपक कदम 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबडकरांनी संपूर्ण आयुष १८- १८ तास अभ्यास करुन देशाला संविधन दिले, समजा उन्नतीचा मार्ग व राष्ट्र निर्मितीचा मार्ग अभ्यासातून मिळाला. यामुळे प्रत्येक समाजातील कुटुंबाने घराघरात अभ्यासात्मक अभिवादन करुन बाबासाहेबाना अभिवादन करावे.

आंबेडकरवादी समाज हा विज्ञानिष्ठ व कायदाचे पालन करणारा समजा आहे. रस्त्यावर येऊन जयंती साजरी करुन कोरोनाच्या काळात समाजाचा जीव धोक्यात घालू नये, शिक्षण आणि अभ्यासातून समाज प्रगती होणार आहे. बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक क्रांती शिक्षणातुन प्राप्त होणार आहे.

हेही वाचा Motivational Story:जिद्दीने गाठले यशाचे शिखर; नांदेडच्या शेतकऱ्याची मुलगी निमलष्करी दलात

आज केवळ १२ टक्के एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थी पदवीपर्यंत शिक्षण घेतात, ही एक गंभीर समस्या होय. शिक्षित समाजच अन्याय व शोषण मुक्त होऊ शकतो. आंबेकरवादी शिक्षित समाजच शाषन करता होऊ शकतो आणि तोच या देशात बाबासाहेब ना अपेक्षित सामाजिक लोकशाही व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करु शकतो.

जातिविरहित, भारत बुद्धमय करणारच स्वप्नं पूर्ण करु शकतो. तेव्हा अभ्यसात्मक अभिवादन करुन प्रज्ञासुर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वश्रेष्ठ अभ्‍यासात्मक अभिवादन घराघरातून करुन या वर्षी जयंती साजरी करावी. गेल्या २० वर्षापासून सलग १८ तास अभ्यास उपक्रमद्वारे राष्ट्रीय पातळीवर अनेक राज्यात अभ्यास भव्य सोहळा आयोजित केले जातात. पण या वर्षी कोरोनाचा जागतिक संकट पाहता घरा- घरात या वर्षी अभ्‍यास उपक्रम साजरा करावा व अभ्यासात्मक जयंती करावी असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.

loading image
go to top