Nanded: लोकसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणीला सुरूवात; नांदेडमध्ये दहा जूनला अमित शहांची सभा Amit Shah meeting on June 10 in Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit shaha

Nanded: लोकसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणीला सुरूवात; नांदेडमध्ये दहा जूनला अमित शहांची सभा

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात जनकल्याणाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे ३० मे ते ३० जून दरम्यान देशभर ‘मोदी@९’ अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील या महाजनसंपर्क अभियानाची सुरवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेने नांदेडपासून होणार आहे.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. शहरातील बाफना चौकाजवळील अबचलनगर येथील मैदानावर शहा यांची शनिवारी (ता. दहा) सायंकाळी पाचला ही सभा होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन,

जनसंपर्क अभियानाचे मराठवाडा प्रमुख आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित राहातील. पावसाची शक्यता लक्षात घेऊन १८० बाय १२०० चा वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात येणार असून, त्यात ४० हजार खुर्च्या बसू शकतील. शिवाय १२ एलईडीचीही व्यवस्था करण्यात येईल.