नांदेड : हिवाळी अधिवेशनापूर्वी पेन्शन लागू करा

जुन्या पेन्शनधारकांची मागणी; अन्यथा आंदोलनाचा सरकारला इशारा
 हिवाळी अधिवेशनापूर्वी पेन्शन लागू करा
हिवाळी अधिवेशनापूर्वी पेन्शन लागू कराsakal

नांदेड : हिवाळी अधिवेशनापूर्वी जुनी पेन्शन लागू करावी, अशी मागणी जुन्या पेन्शनधारकांनी केली आहे. त्यामुळे आता आपणास आरपारची लढाई लढायची आहे. त्यासाठी कल्याण ते मुंबई पेन्शन मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी मंगळवारी (ता. ३०) केले.

जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ता. २२ नोव्हेंबरपासून आझाद मैदान मुंबई ते सेवाग्राम (जि. वर्धा) पर्यंत पेन्शन संघर्ष यात्रेचे आयोजन केले होते. ही पेन्शन यात्रा मंगळवारी सकाळी नांदेडला आली. या निमित्ताने राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने हनुमान मंदिर सभागृह, विजयनगर येथे पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून राज्याध्यक्ष खांडेकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणेचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे, राज्य कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे, राज्य सरचिटणीस गोविंद उगले उपस्थित होते. यावेळी कार्यकारिणीत निवड झाली म्हणून शिक्षण परिषदचे मधुकर उन्हाळे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे देवीदास बस्वदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 हिवाळी अधिवेशनापूर्वी पेन्शन लागू करा
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

आमदार हंबर्डे यांनी पेन्शन लढाईमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत तुमच्या बैठकीसाठी पुढाकार घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. या पेन्शन परिषदेत १९८२ ते १९८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनावर दबाव निर्माण करण्याच्या या कार्यात यावेळी विविध विभागातील २००५ नंतर शासकीय सेवेत आलेले कर्मचारी सहभागी झाले होते.

सदरील परिषद यशस्वी करण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद करकिले, जिल्हा सरचिटणीस संदीप मस्के, शिक्षक सहकार संघटना राज्य संघटक रवी ढगे, बसवराज पाटील वन्नाळीकर, जिल्हा कार्याध्यक्ष गणपती बोथीकर, जिल्हा कोषाध्यक्ष पुंडलिक भोसले, जिल्हा मार्गदर्शक ग्रामसेवक संघटनेचे शिवकुमार देशमुख, आरोग्य विभागाचे पुष्पराज राठोड, कृषी विभागाचे वसंत जारीकोठे, जिल्हा सहसचिव किशोर नरवाडे, जिल्हा प्रतिनिधी संजय केलेपवार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com