अर्धापूर नगरपंचायत : नगराध्यक्षपदाच्या नावाचा लिफाफा उघडणार

अर्धापूर नगरपंचायत : नगराध्यक्षपद निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
Nagar Panchayat Election
Nagar Panchayat Electionesakal

अर्धापूर : नगरपंचायतीच्या पाचव्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सोमवारी (ता.सात) उमेदवारी अर्ज भरण्याने सुरुवात होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीचे सर्वाधिकार पालकमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले असले तरी इच्छुक नगरसेवकांनी गेल्या चार दिवसांपासून जोरदार लाॅबिंग केली आहे. नगराध्यक्षापद हे खुल्या प्रवर्गसाठी सुटले असल्याने सर्वच नगरसेवकांनी मोर्चे बांधणी केली आहे.

Nagar Panchayat Election
कोरोनामुक्‍तीनंतर मृत्यू झालेल्यांनाही 50 हजारांची मदत! ऑफलाइन अर्ज करता येईल

पालकमंत्री अशोक चव्हाण कोणत्या नगरसेवकाच्या नावाला पसंती देतात याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर काँग्रेसच्या गटनेतेपदी शालीनी व्यंकटेश शेटे यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांत नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसच्या निष्ठेने व पडत्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर संधी मिळावी अशी सर्वसाधारण नगारिक, कार्यकर्त्यांची भावना आहे.

नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे, तर गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे. तर उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सोमवारी (ता. १४) पार पडणार आहे. नगराध्क्षपदासाठी दोन अर्ज दाखल होवून कायम राहिल्यास सोमवारी मतदान घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com