अर्धापूर : दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार दोघे जखमी, महामार्ग पोलिस चौकी झाली अपघात चौकी..

लक्ष्मीकांत मुळे | Wednesday, 6 January 2021

नांदेड- अर्धापूर रस्त्यावरील मुनीरभाई यांच्या धाब्यासमोरील रस्त्यावर ट्रक व दूचाकीचा आपघात मंगळवारी (ता. पाच) दूपारी पाच वाचण्याचा सुमारास झाला आहे. या अपघातात अर्धापूर शहरातील इंदिरानगर भागातील दोन सख्खे  भाऊ जखमी झाले आहेत

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : अर्धापूर तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदेड- अर्धापूर रस्त्यावरील मुनीरभाई यांच्या धाब्यासमोरील रस्त्यावर ट्रक व दूचाकीचा आपघात मंगळवारी (ता. पाच) दूपारी पाच वाचण्याचा सुमारास झाला आहे. या अपघातात अर्धापूर शहरातील इंदिरानगर भागातील दोन सख्खे  भाऊ जखमी झाले आहेत. यात एका भावाची प्रकृती गंभीर आहे. तर दूसरा अपघात रविवारी (ता. तीन ) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अर्धापूर- वसमत रस्त्यावरील मेंढला पाटी जवळ झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

अपघाताबाबत वसमतफाटा महामार्ग पोलिस सुरक्षा पथकाने दिलेली माहिती अशी की, अर्धापूर शहरातील इंदिरानगर भागात राहणारे संजय भिमराव जोगदंड व संदीप भिमराव जोगदंड हे दुचाकीवरुन (एमएच26-क्यु- 8531) दुपारी अर्धापूरकडून नांदेडला जात असतांना नांदेडकडून मालवाहतूक करणारा ट्रक ( जीजे36-व्ही- 8283) हिंगोलीकडे जात होता. हा ट्रक महामार्ग पोलिस चौकीजवळ आला असता ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात वरील दोघे भाऊ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील विष्णुपूरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचानांदेड जिल्ह्यात ९१० ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी सुरू; १०३ ग्रामपंचायती बिनविरोध -

Advertising
Advertising

माधव धूतराज याचा अपघातात मृत्यू

तर दुसरा अपघात अर्धापूर- वसमत रस्त्यावरील मेंढला पाटीजवळ झाला. अर्धापूरकडून कार (एमएच29- बीसी- 3789) वसमतकडे जात होती. तर वसमकडून दुचाकीवरुन (एमएच26-एव्ही- 3616) माधव विठ्ठल धुतराज (वय 30) रा. लिंबगाव जि. नांदेड हे अर्धापूरकडे येत असतांना दोन्ही वाहनांचा मेंढला पाटीजवळ अपघात झाला. यात माधव धुतराज हा गंभीर जखमी झाला. त्यांना अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तापासांती मृत घोषित केले.

पोलिस सुरक्षा चौकी आहे की अपघात चौकी

अर्धापूर- नांदेड रस्त्यावरील वसमतफाटा येथे महामार्ग सुरक्षा पथक चौकी आहे. या चौकी परिसरात चौक असून अर्धापूर ते वसमत, अर्धापुर ते नांदेड, नांदेड ते हिंगोली हे रस्ते जातात. या रस्त्यावर वाहणांची सतत वर्दळ असते. पण सुरक्षा चौकी परिसरातील चुकीच्या चौकामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. गेल्या तीन महिण्यात सहा ते सात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ही सुरक्षा चौकी आहे की अपघात चौकी आहे अशा संतप्त प्रतिक्रिया वाहन चालकातून व्यक्त केल्या जात आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे