
मुदखेड शहरात ता. ३१ आॅक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास व्यापारपेठ गजबजलेली असताना अनोळखी दरोडेखोरांनी प्रसाद ज्वेलर्सचे सराफा व्यापारी राघवेंद्र पबितवार यांनी आपले सराफी दुकान बंद करून त्याच इमारतीत वरच्या मजल्यावरती असलेल्या घराकडे जात असताना दुकानाच्या ओट्यावरच दुचाकीवरून आलेल्यांनी सशस्त्र हल्ला केला.
मुदखेड (जिल्हा नांदेड) : येथील सराफा व्यापारी राघवेंद्र पबितवार यांच्यावरील झालेल्या हल्लाप्रकरणी सोमवारी (ता. दोन) शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुपारी बारावाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध केला. यानंतर हल्लेखोरांना तात्काळ अटक करून व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मुदखेड शहरात ता. ३१ आॅक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास व्यापारपेठ गजबजलेली असताना अनोळखी दरोडेखोरांनी प्रसाद ज्वेलर्सचे सराफा व्यापारी राघवेंद्र पबितवार यांनी आपले सराफी दुकान बंद करून त्याच इमारतीत वरच्या मजल्यावरती असलेल्या घराकडे जात असताना दुकानाच्या ओट्यावरच दुचाकीवरून आलेल्यांनी सशस्त्र हल्ला केला. त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्याची व रोख रकमेची असलेली बॅग पळवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सराफा व्यापारी राघवेंद्र पबितवार यांनी त्या दरोडेखोरांशी हिमतीने झुंज दिली. यामध्ये हे दरोडेखोर ऐवज लंपास करण्यात अयशस्वी झाले. परंतु या दरोडेखोरांनी राघवेंद्र पवितवार यांना जीवे मारण्याच्या हेतूने गावठी पिस्तूल काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न करत असताना त्या पिस्तूलातील काडतूस जमिनीवरती पडले. त्यामुळे पिस्तुलातून गोळ्या झाडता आल्या नाहीत. सुदैवाने सराफा व्यापारी राघवेंद्र पवितवार हे बालबाल बचावले. हा प्रकार चालू असताना समोरच्याच युवा व्यापारी गजानन पडोळे यांनी धाव घेतली असतात हे दरोडेखोर पसार झाले.
हेही वाचा - पावसाने उसंत दिल्याने गावरान सीताफळाला नैसर्गिक गोडवा ! -
वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणा
मुदखेड शहरामध्ये हे मागील पन्नास वर्षाच्या कालावधीत आजपर्यंत व्यापाऱ्यांवरती हल्ला होण्याचे किंवा व्यापारपेठेत दरोडा घालून लूटमार करण्याचे प्रयत्न कधीही झाले नव्हते. आज गुन्हेगारांची मुदखेड शहरात मोठी हिम्मत वाढलेली दिसत आहे. मुदखेड शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो या बाजारपेठमध्ये लोकांचे मोबाईल लंपास केले जातात. तर कोणाचे पाकीट मारले जाते. मुदखेड शहरामध्ये मागील काही दिवसापासून दुचाकी चोरांचेही प्रमाण वाढले आहे. घरफोड्यांचे हे प्रमाण वाढलेले आहे. म्हणजेच मुदखेड शहरामध्ये हे गुन्हेगारांचे वास्तव्य वाढल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. व्यापाऱ्यांना पोलिस प्रशासनाकडून सुरक्षा देऊन आमचे गुन्हेगारांपासून संरक्षण करावे.
या आहेत मागण्या
मुदखेड शहराच्या व्यापार पेठेमध्ये आम्ही व्यापाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला पोलिस चौकी उभारून दिलेली आहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलिस शिपाई देऊन चौकी चालु करावी, आमचा पोलिस प्रशासनावर संपूर्ण विश्वास असून पोलिस प्रशासनाने मुदखेडच्या बाजारपेठेत दुपारी बारा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत पोलिस जवानांची गस्त वाढून आम्हाला सुरक्षा द्यावी, व राघवेंद्र पबितवार यांच्यावरती भ्याड हल्ला केलेल्या दरोडेखोरांचा छडा लावून त्यांना जेरबंद करावे.अशा मागण्या केल्या आहेत. या वेळी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ गणपती मंदिर पासुन पायी तहसिल कार्यालयात जाऊन नायब तहसिलदार जोगदंड यांना निवेदन देण्यात आले.
येथे क्लिक करा - औरंगाबाद विभागातील ५० नायब तहसीलदारांच्या बदल्या
यांची होती उपस्थिती
तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर बाजार समितीचे संचालक संदिप पाटील गाढे, गटनेते माधव कदम, शंकर राठी, ओम सोनी, प्रविण काचावार, कालिदास जंगीगीलवाड, सदाशिव शहाणे, सुरेश शहाणे, सराफा व्यापारी मुकेश मामीडवार, गजानन कदम,गिरिष कोत्तावार, किशोर पारवेकर, सचिन चंद्रे, राजु आप्पा रायपत्रेवार, संतोष कालानी, ईलियास पठाण, मनिष चक्करवार, गोविंद गोपनपल्ले, पुरुषोत्तम चांडक, निळकंठ पडोळे, ईश्वर पिन्नलवार, इशान चक्करवार, अमोल आडकीणे, रवि शहाणे, संजय गाळगे, पत्रकार शेख जब्बार, गंगाधर डांगेसह मुदखेड शहरातील व्यापारी मोठया संख्येने उपस्थीत होते.
संपादन - प्रल्हाद कांबळे