esakal | अर्रारर : कोरोना तपासणी प्रयोगशाळेतच कोरोनाचा शिरकाव 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील एका महिलेसह चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव आल्याने प्रयोगशाळेचे काही दिवस  काम राहणार बंद झाले आहे.

अर्रारर : कोरोना तपासणी प्रयोगशाळेतच कोरोनाचा शिरकाव 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील एका महिलेसह चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव आल्याने प्रयोगशाळेचे काही दिवस  काम राहणार बंद झाले आहे. आता डाॅ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयावर ताण आला आहे. या लॅबमधून नांदेड, हिंगोली व परभणी  जिल्ह्यातील स्वॅब तपासणी होत होती. 

नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरी भागानंतर आता या आजाराने ग्रामीण भागातही आपले पाय पसरले आहेत. या महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर कोरोना तपासणी करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेतच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सदर प्रयोगशाळेतील एक महिला कर्मचारी कोरोना बाधित झाली आहे. त्यापाठोपाठ येथील आणखी तीन     कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. त्यामुळे गुरुवारपासून ही प्रयोगशाळा बंद करण्यात आली आहे. काही दिवस ही प्रयोगशाळा बंद राहणार आहे.

नांदेड, हिंगोली व परभणी या जिल्ह्यातील रुग्णांचे स्वॅब तपासणी

ता. 23 एप्रिल 2020 पासून नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोरोना आजाराची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. नांदेड, हिंगोली व परभणी या जिल्ह्यातील रुग्णांचे स्वॅब तपासणी येथे तपासणीसाठी नियमित येतात. आतापर्यंत या प्रयोगशाळेत १५ हजाराहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. अशी माहिती विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर झोरे यांनी दिली. दररोज दोनशे ते अडीचशे तपासणी करण्यात येते. विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. त्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सदरची प्रयोगशाळा सुरू झाली. त्यामुळे नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील रुग्णांची तपासणीची सोय येथे झाली.

हेहा वाचा -  महापालिकेच्या दोन अभियंत्यांना नोटीसा- हिंगोली गेट उड्डाणपुलाखाली पाणी

गुरुवारपासून ही प्रयोगशाळा बंद करण्यात आली आहे

मात्र विद्यापीठातील प्रयोगशाळेतील एक महिला कर्मचारी आपल्या गावाकडे गेल्यानंतर तेथेच दिला कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ येथील आणखी तीन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येते. या प्रयोगशाळेत दहा लॅब टेक्नीशियन, पाच पीसीआर मशीन ऑपरेटर व चार डाटा एंट्री ऑपरेटर, शिपाई असे एकूण 28 कर्मचारी काम करतात. प्रयोग शाळेतील कर्मचारी पॉझिटिव आढळल्यानंतर गुरुवारपासून ही प्रयोगशाळा बंद करण्यात आली आहे. येथील सर्व कर्मचाऱ्यांना काॅर्न्टाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे लागतील

सध्या तरी 21 तारखेपर्यंत प्रयोग शाळा बंद ठेवण्यात येणार असली तरी किमान आठ ते दहा दिवस प्रयोगशाळा सुरू होऊ शकणार नाही असे दिसते. दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळा बंद झाल्यामुळे तपासणीसाठी येणारे सर्व स्वॅब आता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे लागतील. त्यामुळे सहाजिकच महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचा कामावर अधिक येणार आहे परिणाम नमुन्यांची तपासणी अहवाल प्राप्त होण्यासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

loading image