नांदेड जिल्ह्यात कांदा बियाण्यांची कृत्रिम टंचाई 

File photo
File photo

नांदेड : जिल्ह्यातील काही व्यापारी नामांकित कांदा बियाण्याच्या काळाबाजार करत असून बियाण्याची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराने कांदा बियाणे विक्री करत आहेत. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच अस्मानी संकटामध्ये असल्याने त्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशामध्येच व्यापारी शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचे प्रकार वारंवार घडत असताना, प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे. सद्यस्थितीत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना कांदा लागवडीकडे आपला कल केला आहे. परिणामी, शेतकऱ्यांची ही गरज ओळखून नांदेड जिल्ह्यातील व्यापारी कांदा बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याची गंभीर समोर आली आहे. 

यासंदर्भात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले की,  यावर्षी सरासरीपेक्षा कांद्याला भाव बाजारात चांगला मिळत आहे. परंतु, व्यापारी त्यांना सुदरु देत नाही. नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. परंतु नांदेड शहरातील अनेक व्यापारी नामांकित कांदा बियाण्यांचा काळाबाजार करून शेतकऱ्याला अव्वाच्या सव्वा दराने कांदा बियाणे विकत आहेत. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी मागितलेले कांद्याचे बियाणे उपलब्ध नाही, असे सांगून दुकानातून परत पाठवत आहेत.

कृषी विभागाने कारवाई करावी 
कांदा बियाण्याच्या किंमतीमध्ये अचानकपणे दुपटीने वाढ का झाली? याची चौकशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी करावी. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये बियाणी मिळावे, बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये यासाठी काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा कृषी विभागाच्या व कांदा बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

यांच्या आहेत सह्या
निवेदनावर प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर, प्रदेश सल्लागार विजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रशांत आबादार, ज्ञानोबा गायकवाड, पांडुरंग पाटील पोपले, मोतीराम पवार, संदीप पावडे, विनीत पाटील, शेख रहीम, शेख अकबर, विजय पाटील शिंदे, विलास माने, अविनाश कदम, भगवान कदम, विक्रम क्षिरसागर, पवन सूर्यवंशी, सतिष चव्हाण, पिंटू पाटील गाढे आदींच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com