esakal | नावाला साजेल असे श्री. गुरु गोविंदसिंग रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार

बोलून बातमी शोधा

guru govindshing hospital nanded
नावाला साजेल असे श्री. गुरुगोविंदसिंग रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील सर्वाधीक रुग्णांचा भार श्री. गुरुगोविंदसिंग जिल्हा रुग्णालयावर आहे. या ठिकाणी कोविड सेंटर असून रुग्णालयात दाखल कोरोना बाधितावर आरोग्य यंत्रणेकडून योग्य तो उपचार केल्या जात आहे. त्यामुळेच या रुग्णालयातील रुग्ण काही दिवसातच ठणठणीत होतात. याचे कारण असे की, येथील आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, डाॅक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य सेवक यांच्या मवाळ, समजदारी व आपलेपण. ही सर्व मंडळई रुग्णांना मानसिक आधार देत त्यांना धीर देतात. एवढेच नाही तर त्यांची सुश्रुषा करण्यात कुठेच कुचराई करत नसल्याचे दिसुन येते.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री. गुरु गोविंदसिंग जिल्हा रुग्णालयावर सध्या कोरोना काळात प्रचंड ताण आहे. या ठिकाणी उपचार घेणारा सर्वसाधारण वर्गातील रुग्ण असतात. त्या रुग्णांना धीर देत त्यांच्यावर योग्य असे उपचार करुन आपण या आजारातून नक्कीच बरे व्हाल, हा काळ कठीण जरी असला तरी आम्ही आपल्यासोबत आहोत, आपण काळजी करु नका असा धीर देत रुग्णांना आपण रुग्णालयात उपचार घेत नसून आपल्या घरीच उपचार घेत आहोत असे वाटत आहेत.

हेही वाचा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्टचा पाईप फुटल्याची घटना मंगळवारी (ता. 27) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

मागील एक वर्षापासून कोरोनाशी प्रशासन दोन हात करत आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या घटावी यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. विपीन, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निळकंठ भोसीकर, महापालिका आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांच्यासह सर्वच शासकिय यंत्रणेतील अधिकारी, विभागप्रमुख, समाजसेवक, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. गतवर्षी बऱ्यापैकी त्यावर नियंत्रण मिळविले होते. मात्र मार्चपासून दुसरी लाट सुरु झाली. या लाटेत रुग्ण संख्या व मृत्यूचा आकडा वाढत गेला. तरीसुद्धा आरोग्य यंत्रणा आपल्या परीने त्यावर नियंत्रण मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. डाॅ. भोसीकर हे स्वत: दिवसातून दोन वेळा रुग्ण तापसणीसाठी येतात. ते रुग्णांची अतिशय जवळून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करतात. काय हवे काय नको याबाबत आपल्या यंत्रणेला सुचना देतात. त्यावरुन रुग्णांची मानसिकता बदलून ते उपचारास मदत करत असल्याने खऱ्या अर्थाने सचखंड नगरीत रुग्णालयाच्या नावाला साजेल असे श्री. गुरुगोविंदसिंग जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण बोलून दाखवतात.

काय म्हणतात कोरोनामुक्त रुग्ण ?

ता. 19 एप्रील रोजी कोरोना आजारातून बरी होऊन घरी आले. मुंबईत योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मी ता. 12 एप्रीलला मुंबईतुन आल्यावर नांदेड येथे गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात दाखल होऊन उपचार सुरु झाले. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलाही मागे टाकले अशी व्यवस्था पाहिली आणि मन थक्क झाले. वरीष्ठ अधिकारी, डॉक्टरची पूर्ण टीम दिवसाकाठी रुग्णालयात रुग्णाच्या प्रत्यक्ष चौकशी करत होती. 24 तास अविरत प्रसन्न चित्ताने सेवा करत होती. कमालीचे नियोजन, अप्रतिम व्यवस्था आहे. सात दिवस सलग ऍडमिट असताना कोणत्याही उणीवा दिसून आल्या नाही. दिसून आले ते फक्त डिओषण नतमस्तक व्हावे असे डिओषण! वयोवृद्ध रुग्णांना डायपर चेंद करणे, त्यांना सु, शी ला नेने, जी काळजी घरचे पण घेणार नाही अशी काळजी घेतली जात होती. श्री. गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयाची व्यवस्थापन कमिटी आणि पूर्ण स्टाफ यांच्या प्रयत्नांना नमन. असंख्य रुग्ण बरे होऊन समाधानाने आपल्या निर्मात्याला पाहून घरी सुखरुप पोहचतोय. अप्रतिम टीम आहे. ज्यांच्या प्रयत्नाने मी आज तुम्हा सर्वांसोबत आहे.

- राधा गवारे, समुपदेशक, कौटुंबीक न्यायालय, मुंबई.