नांदेडमधील खून प्रकरणातील मारेकरी पंजाब पोलिसांच्या चकमकीत ठार

file photo
file photo

नांदेड : शहरातील बंदाघाट परिसरात राहणाऱ्या संतोखसिंग मोहनसिंग निहंगे उर्फ बाबाजी (वय 65) या सेवादाराचा खून करुन पंजाबमध्ये पळून गेलेले दोघेजण पंजाब पोलिस चकमकीत तरणतारण जिल्ह्यातील भिखिविंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठार झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दिली.

शहरातील नगिनाघाट ते बंदाघाट दरम्यान एका लहानशा गुरुद्वारामध्ये सेवादार संतोखसिंग यांचा गळा कापून ता. 11 मार्च रोजी खून करण्यात आला होता. या प्रकरणात वजिराबाद ठाण्यात आरोपी गुरुदेवसिंग खालसा आणि मेहताबसिंग खंडेवाला उर्फ बाबा दोघे राहणार तरणतारण पंजाब यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा करुन हे दोघेही पंजाबमध्ये पळून गेले होते. त्यांच्या शोधात वजीराबाद आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पंजाबमधील तरणतारण येथे गेले होते.

तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रकरणातील दोन्ही आरोपींची माहिती काढत होते. नांदेड पोलिसांच्या माहितीवरुन पंजाब पोलिस दलातील भिखीविंडाचे पोलीस निरीक्षक राजवीरसिंग हे पथकासह भिखिविंडाच्या बहद्दीत ता. 21 मार्चला दबा धरुन बसलेल्या या दोघांना अटक करण्यासाठी गेले होते. मात्र दबा धरुन बसलेल्यांना पोलिसांनी शरण येण्यास सांगितले. उलट त्यांनीच पोलिसांवर तलवारीने प्राणघआतक हल्ला केला. यात दोन पोलिस अधिकारी गंभईर जखमी झाले. यानंतर मात्र पोलिसांनी त्यांच्यावर फायरींग करुन त्यांना यमसदनी पाठविले. गुरुदेवसिंग खालसा आणि मेहताबसिंह खंडेवाला या दोघांनी पोलिसावर तलवारीने हल्ला चढविल्यानंतर हा प्रकार घडला. 

या प्रकरणाची खात्री करण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या एका पथकाला पंजाबला रवाना केले होते. पंजाब पोलिसांच्या चकमीकत ठार झालेले दोघेही नांदेड पोलिसांचे आरोपी होते हे निष्पन्न झाल्यानंतर पथक परत निघाल्याचे श्री. चिखलीकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com