esakal | ऑटोरिक्षा चालक, मालकांच्या प्रश्नांसाठी ‘वंचित’चे नांदेडला आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडला ऑटोरिक्षा चालक, मालकांच्या प्रश्नांसाठी ‘वंचित’चे आंदोलन

नांदेड जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालक, मालक यांच्या विविध प्रलंबित मागण्या व प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरूवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आधीच अडचणीत असलेल्या रिक्षा चालक-मालक यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

ऑटोरिक्षा चालक, मालकांच्या प्रश्नांसाठी ‘वंचित’चे नांदेडला आंदोलन

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालक, मालक यांच्या विविध प्रलंबित मागण्या व प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरूवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कोविड - १९ च्या धर्तीवर मागील सहा महिन्यांपासून राज्यात टाळेबंदी सुरू असून या बंदीच्या परिस्थितीमुळे ऑटोरिक्षा चालक - मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने मागील काही दिवसांपासून ऑटो चालक - मालक यांना ऑटो चालविण्यासाठी परवानगी दिली असली तरी ती अनेक कठोर नियम घालून देण्यात आली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या रिक्षा चालक-मालक यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातून दोनशे बसेसचे नियोजन, पहिल्याच दिवशी पावसाचा अडथळा 

ऑटो चालक - मालक हवालदील 
ऑटोरिक्षामध्ये केवळ दोनच व्यक्तींना प्रवास करण्याची परवानगी दिल्यामुळे ऑटोचालक मालकांचा पेट्रोल, डिझेलचा खर्चही निघत नसल्याने ऑटो चालक - मालक हवालदिल झाले आहेत. अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विनंत्या करूनही यावर प्रशासन निर्णय घेत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऑटो चालक व मालक यांनी त्यांच्या मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात, यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन झाल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

या आहेत मागण्या
ऑटोरिक्षा चालक व मालक यांच्या मागण्या, बॅंकेचे, फायनान्स, बचतगटाचे थकीत हप्ते व्याजासकट माफ करावे तसेच खासगी फायनान्सची दडपशाही थांबवावी, आरटीओची पासिंग फी माफ करावी, लायसन्स रिनिव्हल फी माफ करावी, रोड टॅक्स, ग्रीन टॅक्स, मीटर पावती माफ करावी, लॉकडाऊनच्या काळातील बॅंकेतील थकीत हप्ते माफ करावेत, खासगी शाळांतील पाल्यांची फी माफ करावी, ऑटो चालकांच्या कुटुंबाला अतिरिक्त राशन उपलब्ध करुन द्यावे, ऑटो चालकांना शासनाची कुठलीच मदत न मिळाल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी प्रशासनाने वीस हजार रूपयांची मदत करावी, अशा अनेक प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचलेच पाहिजे - शेकडो गावांचा पाणीप्रश्‍न लोअर दुधना धरणामुळे मिटणार, एकावन्न टक्के पाणीसाठा जमा...

आंदोलनात हे सहभागी
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते गोविंद दळवी, फारूक अहमद, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, महासचिव शाम कांबळे, साहेबराव बेळे, महानगराध्यक्ष अयुब खान पठाण, विठ्ठल गायकवाड, महानगर महासचिव ॲड. बिलाल शेख, हनुमंत सांगळे, कामगार आघाडीचे नेते राज अटकोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संदीप वने, कैलास वाघमारे, शहराध्यक्ष अतीश ढगे, विशाल एडके, सुनील वाघमारे, जयदीप पैठणे, रोहन कहाळेकर, धम्मा थोरात, सलीमभाई पठाण, अविनाश भद्रे, धम्मपाल पैठणे, महेंद्र सोनकांबळे, सुरेश गजभारे, प्रकाश गजभारे आदींची उपस्थिती होती.

 

loading image
go to top