बाळा तुझे वय किती? तू बोलतोस काय? पडळकरांचे टोचले कान, कोणी? ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला. आपल्या फेसबुक खात्यावरून त्यांनी आपल्या शेलक्या शब्दांत पडळकर यांना सुनावले आहे. त्या म्हणतात, ''बाळा तुझे वय किती? तुझा पगार काय? तू बोलतोस काय?'' आमदार पडळकर हे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले नवे नेते असल्याचा आरोपही त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.

नांदेड : सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून स्वत:ची अनामत जप्त झालेले व नुकतेच विधान परिषदेवर भाजपकडून नियुक्त केलेले नवनिर्वाचित आ. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल माध्यमाद्वारे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला. आपल्या फेसबुक खात्यावरून त्यांनी आपल्या शेलक्या शब्दांत पडळकर यांना सुनावले आहे.


सूर्यकांता पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजला टाकलेली पोस्ट

त्या म्हणतात, ''बाळा तुझे वय किती? तुझा पगार काय? तू बोलतोस काय?'' आमदार पडळकर हे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले नवे नेते असल्याचा आरोपही त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. पडळकर यांच्या विधानाचे सर्वत्र निषेध होत असताना सूर्यकांता पाटील यांनीही त्यात उडी घेतली आहे.

'महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे', असे वादग्रस्त वक्तव्य आमदार पडळकर यांनी केल्यानंतर गदारोळ उठला आहे.

हेही वाचा - Video - डॉ. शंकरराव चव्हाण यांचा गौरवग्रंथ ठरणार प्रेरणादायी, कसा? ते वाचाच

पडळकर तू अर्ध्या हळकुंडात पिवळा झालेला नेता

आ. पडळकरांना वडिलकीचा सल्ला देताना त्या पुढे म्हणतात की बाबा तू कुणाच्याही वाटेल जा, पण बारामतीच्या वाटेला जाऊ नको. पडळकर तू अर्ध्या हळकुंडात पिवळा झालेला नेता आहेस. बघ बाबा जरा जपून, कुठून आलात? कुठे गेलात? हेही कळायचे नाही. मात्र काही दिवस निघतील आरामात, बाकी तुमची मर्जी, हरी ओम शांती.

कोण आहेत सूर्यकांता पाटील?

सूर्यकांता पाटील या राज्यातील ज्येष्ठ नेत्या असून नुकतीच त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्त होताना त्या प्रदेश भाजपच्या पदाधिकारी होत्या. मात्र अलिकडच्या काळात भाजपनेही त्यांची फारशी दखल ने घेतल्याने त्यांनी निवृत्ती घेतल्याचे बोलले जाते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा बहुतांश काळ हा काॅंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात गेला आहे.

हे देखील वाचाच - Motivation story : शेतकरी पुत्राच्या यशाने बारूळकरांची मान उंचावली

त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून दोन वेळा व एकदा काॅंग्रेसकडून लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. तसेच यूपीएच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदही भूषविले आहे. शरद पवार यांच्या त्या कट्टर समर्थक राहिल्या आहेत. हिंगोली लोकसभेची जागा २०१४ ला काॅंग्रेसला सोडल्याने त्यांनी पक्षावर नाराज होऊन राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

येथे क्लिक करा - बांबूची शेती ठरेल फायदेशीर, कोण म्हणाले ते वाचा...

भाजपशी घरोबा व आता राजकीय निवृत्तीनंतर त्या थोड्याशा निश्चिंत झाल्या असल्या तरी सोशल मिडियावर सतत क्रियाशील असतात. त्यातच पवारांवरील पडळकरांची टीका त्यांच्या संवेदनशील मनाला पटणारी नसल्याने त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केल्याचे समजते. मात्र या पोस्टच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय चर्चांनाही नेहमीप्रमाणे ऊत आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baby how old are you Are you talking Padalkar's pierced ears. Someone read that nanded news