या भागात ‘कंटेनमेंट झोन’ उठवूनही बॅरिकेट्स कायम

स्वप्निल गायकवाड | Wednesday, 12 August 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन यांच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळताच प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येतो. महापालिकेच्यावतीने बॅरिकेट्स, लाकडे लावून तो भाग सील करण्यात येतो. नवीन नियमाप्रमाने १४ दिवसांपर्यंत सदरील भाग सील करण्यात येतो. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता भागातील सर्व व्यवहार बंद असतात; परंतु कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र)चा कालावधी पूर्ण होऊनही लावण्यात आलेले बॅरिकेट्स, लाकडे जागेवरच आहेत.

नांदेड ः महापालिकेच्यावतीने शहरात लावण्यात आलेले कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र)चा कालावधी पूर्ण होऊनही लावण्यात आलेले बॅरिकेट्स, लाकडे जागेवरच आहेत. यामुळे नागरिकांना मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना यासंदर्भात विचारपूस केली, तेव्हा लवकरच काढू असे म्हणून वेळ मारून नेली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

भागातील सर्व व्यवहार बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन यांच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळताच प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येतो. महापालिकेच्यावतीने बॅरिकेट्स, लाकडे लावून तो भाग सील करण्यात येतो. नवीन नियमाप्रमाने १४ दिवसांपर्यंत सदरील भाग सील करण्यात येतो. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता भागातील सर्व व्यवहार बंद असतात; परंतु कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र)चा कालावधी पूर्ण होऊनही लावण्यात आलेले बॅरिकेट्स, लाकडे जागेवरच आहेत.

लाकडे जागेवरच
शहरातील प्रकाशनगर येथे ता.१८ जुलैरोजी कंटेनमेंट झोन लावण्यात आला होता. ता.१० ऑगस्टरोजी महापालिकेच्यावतीने या भागातील कंटेनमेंट झोन उठवण्यात आला. मात्र तीन दिवस होऊनही या भागात लावण्यात आलेले बॅरिकेट्स, लाकडे जागेवरच आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयालयातील कर्मचाऱ्यांशी नागरिकांनी संपर्क केला असता त्यांनी तुम्हीच तो काढा असे सांगण्यात येते.

हेही वाचा -  गंभीर बाब उघडकीस, कोरोना बाधितांच्या जेवणात चक्क मेलेले मुंगळे... 
 
मार्ग बंद झाल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे. मार्ग बंद राहिल्याने कचरागाडी या भागात येत नाही; तसेच नगरातील वातावरण अतिशय संवेदनशील झाले असून, नागरिकांचा या भागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भीतिदायक झाला आहे. भागातील दुकाने बंद आहेत. अनेकांना याचा फटका बसत आहे. कालावधी संपूनही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

संपादन - स्वप्निल गायकवाड