हिंगोलीत उभारली जाणार सुंदर शिल्पे

राजेश दारव्हेकर | Friday, 3 July 2020

मोकळ्या जागेत अडथळा न होता नगरपालिका प्रशासनातर्फे आकर्षक शिल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी लोकसहभाग देखील घेतला जाणार असल्याने दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी सहभागी होण्याचे अहवान नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

हिंगोली : शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला, दुभाजकमध्ये व मोकळ्या जागेत अडथळा न होता नगरपालिका प्रशासनातर्फे आकर्षक शिल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी लोकसहभाग देखील घेतला जाणार असल्याने दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी सहभागी होण्याचे अहवान नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शहर आता विकासाच्या संक्रमणावस्थेत आहे. शहरात मागच्या काही दिवसांपासून रस्त्याची कामे सुरु असल्याने अनेक भागात झालेले अतिक्रमण निघाल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील
रस्त्याच्या बाजूला, दुभाजकमध्ये, मोकळ्या जागेत, रहदारीस अडथळा न होता चौकात कोणत्याही जाती- धर्माच्या भावना न दुखावणारे आणि समाजाला- तरुणांना प्रोत्साहन देणारे व प्रेरित करणारे असे कलाकृती शिल्प उभारणी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 हेही वाचा -  सत्याग्रह : नांदेडच्या गोदावरी काठी वाळू माफियांच्या विरोधात सत्याग्रह

Advertising
Advertising

शहर सौंदर्याची संकल्पना नगरपरिषदेने घोषित केलेली आहे

यामुळे शहर सौंदर्याची संकल्पना नगरपरिषदेने घोषित केलेली आहे. हे नगरपालिका करणारच आहे. 
पण हे काम लोकसहभागातून झाले तर त्याचे मूल्य अगणित असणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ज्या कोणी दानशूर व्यक्ती, व्यापारी आणि सामाजिक संस्था यांनी असे शिल्प त्यांच्या सौजन्याने शहरात उभारायच्या असल्यास तात्काळ लेखी प्रस्ताव नगरपरिषदेला सादर करावा. जेणेकरून सभागृहाची मान्यता घेऊन आपणास सौंदर्यीकरण करण्यासाठी हस्तांतरित करण्यात येईल असे श्री. पाटील म्हणाले.

वेगळ्या संकल्पना असतील तर कळवा

तसेच आपल्या काही वेगळ्या संकल्पना असतील तर त्याची डिझाइन आणि विस्तृत माहिती, जागेचे स्थळ प्रस्तावसोबत जोडावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. सदर प्रस्तावाची पाहणी करून रहदारीस अडथळा इतर बाबी तपासून अंतिम निर्णय कळविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण तसेच सर्व सदस्यांनी केले आहे. 

येथे क्लिक करा -  मांजरा नदीवर येसगीला ९७ कोटींचा नवीन पुल होणार

शिल्प उभारले जाणार असल्याने शहराचे सौंदर्य खुलणार

दरम्यान, यामुळे शहराच्या वैभवात भर पडली जाणार आहे. स्वच्छ व सुंदर हिंगोली हे ब्रीद पालिका प्रशासनाने घेतल्याने ही कामे देखील केली जाणार आहेत. शहरातील ५७ रस्त्याचे कामे होणार आहेत. त्याची सुरुवात देखील झाली आहे. अरुंद असलेले रस्ते रूंद झाले आहेत. शहरातून अकोला ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो या रस्त्यावर अग्रेसेन चौकापर्यंत दुभाजक आहे. तसेच इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्यापर्यंत दुभाजक आहेत. या मार्गावर शिल्प उभारले जाणार असल्याने शहराचे सौंदर्य खुलणार आहे.