उद्योगांच्या अखंडीत वीजपुरवठ्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न- दत्तात्रय पडळकर

लघू उद्योग भरती या प्रमूख संघटनेसह इतर औद्योगिक ग्राहक संघटना व त्यांचे प्रतिनिधी सोबत नुकताच मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी प्रत्यक्ष सुसंवाद साधला.
मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर
मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर

नांदेड : नांदेड व कृष्णूर औदृयोगिक वसाहतीतील उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत उद्योगांच्या अखंडीत वीजपुरवठ्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत अखंडीत वीज सेवा देण्यास महावितरण बांधील असल्याचे अभिवचन देत नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी वीजबिलांचा भरणाही वेळेच्या आत करावा असे आवाहनही उद्योजकांना केले.

लघू उद्योग भरती या प्रमूख संघटनेसह इतर औद्योगिक ग्राहक संघटना व त्यांचे प्रतिनिधी सोबत नुकताच मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी प्रत्यक्ष सुसंवाद साधला. यावेळी उपस्थित उद्योजकांनी वीजपुरवठया संबंधी समस्या मांडत महावितरणने देखभाल दुरुस्तीचे वेळापत्रक निश्चीत करुन देखभाल करावी जेणेकरुन वेळापत्रकानुसार आम्हाला काम करता येईल. त्याचबरोबर रोहीत्रामधील ऑईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे उद्योजकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर आळा घालण्यासाठी महावितरणने पोलिस कारवाई करावी.

हेही वाचा - ब्रिटनसह इतर यूरोपीय देश निर्बंधातून सूट देण्याच्या तयारीत नाहीत

नांदेड औद्योगिक क्षेत्रासाठी प्रत्येक रोहित्रावर ऐबी स्वीच बसवण्यात यावे जेणेकरुन देखभालीसाठी संपूर्ण वीजवाहिनी बंद ठेवण्याची गरज पडणार नाही. तसेच कृष्णूर औद्योगिक क्षेत्रासाठी स्थायी सहायक अभियंता व रात्र पाळीसाठी लाईनमन नियुक्त करावे. बरबडा उपकेंद्रावरुन वीजपुरवठा देण्याऐवजी 220 केव्ही लाईनवरुन द्यावा अशा प्रमूख मागण्या उद्योजकांनी मुख्य अभियंता यांच्या समोर मांडल्या.

औद्योगिक ग्राहकांना नेहमीच उत्कृष्ट सेवा देण्यावर महावितरणचा भर असून आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत त्यात आणखी सुधारणा करण्यात येतील. तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामाचे योग्य ते नियोजन करुन या कामासाठी औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन देत महावितरणची आर्थिक परिस्थिती पाहता उद्याोजकांनीही वेळेच्या आत थकबाकी व चालू देयकांचा भरणा करावा असे आवाहनही मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com