esakal | गुन्हेगारांनो सावधान : नांदेड पोलिस परिक्षेत्रात आता निसार तांबोळींची चलती 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मनोज लोहिया यांच्या रिक्त झालेल्या बदलीमुळे त्यांच्या जागी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आपल्या पदाचा पदभार घेतला आहे. 

गुन्हेगारांनो सावधान : नांदेड पोलिस परिक्षेत्रात आता निसार तांबोळींची चलती 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक या पदाची सुत्रे निसार तांबोळी यांनी शिक्षकदिनी स्विकारली. मनोज लोहिया यांच्या रिक्त झालेल्या बदलीमुळे त्यांच्या जागी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आपल्या पदाचा पदभार घेतला आहे. 

नुकत्याच राज्यातील २५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढण्यात आले होते. आठ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नतीत पोलीस उपमहानिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना कोल्हापूर परिक्षेत्रात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी निसार तांबोळी यांना पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नांदेडला नियुक्ती देण्यात आली. निसार तांबोळी यांनी आपली पोलिस दलातील सुरुवात नांदेड जिल्ह्याच्या भोकर उपविभागातून सुरू केलेली आहे.

हेही वाचावाळू माफियांचा हैदोस खपवून घेणार नाही- पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे
उत्कृष्ट पदावर कार्य केले आहे

अनेक उत्कृष्ट पदावर कार्य करून आपल्या कामाची दखल सरकारला घ्यावी लागली. म्हणूनच ते पोलीस उपमहानिरीक्षक असताना विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या जागी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. असाच काहीसा प्रकार नांदेडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्यासाठी सरकारने केला आहे. त्यांना अमरावती पोलिस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक पद देण्यात आले आहे. 

परिक्षेत्रातील वाढलेली गुन्हेगारी कमी व्हावी

निसार तांबोळी हे मुळचे लातूर जिल्‍ह्याचे असून त्यांनी राज्यातील औरंगाबाद, नांदेड, मुंबई आदी महत्वाच्या ठिकाणी पोलिस खात्यात सेवा दिली आहे. ते औरंगाबाद येथील आयआरबीचे समादेशक असताना काही दिवसांसाठी नांदेड पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांना नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्याचा जवळून अनभव आहे. ते या परिक्षेत्रातील वाढलेली गुन्हेगारी आपल्या कार्यशैलीतून कमी करतील असा विश्‍वास नांदेडकरांनी व्यक्त केला.