विधायक कामात भोकरकरांचा खारीचा वाटा- न्यायाधीश एम. एस. शेख 

file photo
file photo

भोकर (जिल्हा नांदेड) : मागील सात आठ महिन्यापासून देशात नव्हे तर जगात कोरोना विषाणूंमुळे जनता हैराण झाली आहे. अशा संकटसमयी अनेकांना मोठी किंमत मोजावी लागली. शहरातील विविध सेवाभावी संस्था. शासकीय अधिकारी व  पत्रकारांनी मोठ्या धीराने संकटाचा मुकाबला करून त्यावर मात केली आहे .भोकरकरांचा या विधायक कामात खारीचा वाटा आहे. असे प्रतिपादन येथील जिल्हासत्र न्यायधीश एम. एस. शेख यांनी बूधवारी ( ता. ११) केले आहे.

येथील भोकर तालुका विधीसेवा समिती व नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा जनजागरण मोहीम राबविण्यात आली. न्यायालयाच्या सभागृहात कोरोनायोध्दाचा गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर न्यायाधीश श्रीमती तळेकर. न्यायधीश मंदार देशपांडे. तहसीलदार भारत सूर्यवंशी,.पालीकेचे मुख्याधिकारी प्रणीता टोंगे,.पोलिस निरीक्षक विकास पाटील, वैद्यकीय अधिक्षक अशोक मूंडे, तालुका आरोग्य अधिकारी राहूल मोरे यांची उपस्थिती होती.

श्री.शेख म्हणाले की, भोकर शहरात लाकडाऊनच्या दरम्यान पोलिस आणि आरोग्य विभागाने तसेच शासकीय अधिकारी‌,कर्मचा-यांनी आणि विविध सेवाभावी संस्था, नगरपालीका, पत्रकार यांनी स्वंयसूर्फर्तीने पूढाकार घेऊन सेवा दिली आहे. तब्बल तीन ते चार महिने सेवाभावी संस्थाच्या पदाधिका-यानी गरजू लोकांना मोफत भोजनाची व अन्नधान्य कीटची व्यवस्था केली. तसेच पोलिस व आरोग्य कर्मचा-याना भोजनदान दिल आहे. दरम्यान शासकीय सेवा बजावताना अनेकाना कोरोनाची लागन झाली होती.तरी काम थांबवले नाही.अशा संकटात न डगमगता भोकरकरानी मोठ्या धाडसाने मदतीचा हात दिला आहे.सामाजीक बांधीलकी जोपासत केलेलं मोलाचं कार्य कौतुकास्पद आहे. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप असावी म्हणून न्यायालय आणि पालीकेच्या संयुक्त विद्यमाने कोरोनायौद्दाचा गौरव करण्याचे नियोजन केले आहे. तालुका विधी सेवा समिती व पालीकेच्या वतीने शहरात जनजागरण मोहीम राबविण्यात आली आहे.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.कोरोना आणखी संपला नाही तेव्हा जनतेनी गाफील न राहता सावधगिरी बाळगली पाहिजे असे श्री शेख यांनी सांगितले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड.शिवाजी कदम यांनी करून आभार मानले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com