नांदेड : खुरगावला गुरुवारी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना

श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विविध कार्यक्रम; श्रामणेर शिबिराचा समारोप
Bhumi Pujan ceremony of gautam buddha statue oj05
Bhumi Pujan ceremony of gautam buddha statue oj05sakal

नांदेड : बुद्ध जयंतीच्यानिमित्ताने तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना भूमीपुजन सोहळा गुरुवारी होत आहे. यानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्रामणेर शिबिराचाही समारोप होणार आहे.

या सोहळ्याला आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम, क्षेत्रीय विकास अधिकारी चंद्रशेखर दहिवळे, विपश्यनाचार्य गौतम भावे, रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे, बहुजन संघर्ष सेनेचे सुखदेव चिखलीकर, माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, शंकर गोडबोले, एल. आर. कांबळे, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे, धम्मदान आणि धम्मसंदेश यात्रेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, धम्मसेवक निवृत्ती लोणे, उपासिका सुरेखा इंगोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी मंगळवारी दिली. श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती सोहळा पौर्णिमोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे.

दहा फुटांच्या अखंड पाषाणातील संगमरवरी दगडाची बुद्धमूर्ती प्रशिक्षण केंद्रात बसविण्यात येणार आहे. त्याचा भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून याशिवाय परित्राणपाठ, त्रिसरण पंचशील, अष्टशील, दसशील, त्रिरत्न वंदना, गाथापठण, बोधीपुजा, बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना भूमीपुजन, आनापान ध्यान साधना, धम्मदेसना, भोजनदान, आर्थिक दान आदी कार्यक्रम होणार आहेत.

तसेच भदंत पंय्याबोधी, भिक्खूनी वंदना, चंद्रमणी, धम्मकिर्ती, श्रद्धानंद, सुनंद, शिलभद्र, सुमेध, सुगत यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवस घेण्यात आलेल्या श्रामणेरी श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात येणार आहे.

यांनी घेतली होती श्रामणेर दीक्षा...

बुद्ध जयंतीनिमित्त दहा दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात सुमेश चौदंते, सुधीर लोणे, कपिल खंदारे, राष्ट्रपाल खंदारे, नैतिक पोटेकर, संविधान सावंत, आकाश राऊत, सोहम सावंत यांना भिक्खू संघाने दीक्षा दिली. तर भिक्खूनी वंदना यांनी बायना फुनसे, नंदिनी कुलदीपके, पौर्णिमा कुलदीपके, गौतमी कुलदीपके, समृद्धी आठवले या मुलींना श्रामणेरी दीक्षा दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com