विहिरीत टाकले ब्लिचिंग पावडर; पुढे काय झाले वाचा

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 7 July 2020

माहूर तालुक्यातील आष्टा तांडा येथील गावात पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीत दूषित पाणी गेल्याने व ब्लिचिंग पावडर अधिक प्रमाणात टाकल्याने महिला व पुरुषांना (एकूण ५५) जुलाब उलट्या व मळमळचा त्रास सुरू झाल्याने त्यांना आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी दिली.

वाई बाजार, ता.माहूर : माहूर तालुक्यातील आष्टा तांडा येथील सार्वजनिक विहिरीत दूषित पाणी गेल्याने व ब्लिचिंग पावडर जास्त प्रमाणात टाकल्याने जुलाब, उलटी व मळमळचा त्रास सुरू होऊन ५५ ग्रामस्थ बाधित झाले आहेत. आजपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वच रुग्णावर उपचार करण्यात आले असून, रुग्णांची संख्या कमी-अधिक होत आहे.

हेही वाचा -  धक्कादायक : नांदेडला कोरोनाचा १४ तासात दुसरा बळी 
 
जुलाब उलट्या व मळमळचा त्रास 
माहूर तालुक्यातील आष्टा तांडा येथील गावात पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीत दूषित पाणी गेल्याने व ब्लिचिंग पावडर अधिक प्रमाणात टाकल्याने महिला व पुरुषांना (एकूण ५५) जुलाब उलट्या व मळमळचा त्रास सुरू झाल्याने त्यांना आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी दिली.

रुग्णावर मोबाईल बॅटरीच्या साह्याने उपचार
तालुक्यातील आष्टा तांडा येथे गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता एक सार्वजनिक विहीर आहे. त्या विहिरीतून गावात पाणीपुरवठा करण्यात येतो. विहिरीतील पाणी हे निर्जंतुक व स्वच्छ राहण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ब्लिचिंग पावडर टाकले; मात्र जास्त प्रमाणात टाकण्यात आल्याने गावातील नागरिकांना जुलाब, उलटी, पोटदुखी त्रास सुरू झाला. शनिवारी (ता.चार) संध्याकाळी काही नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा येथे उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्यावर डॉ.जाधव, डॉ. निरंजन केशवे यांनी विजेच्या लपंडावामुळे अंधारात रुग्णावर मोबाईल बॅटरीच्या साह्याने उपचार केला. रुग्णांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईन व आवश्यक औषधी साठा उपलब्ध माहिती दिल्यानंतर तातडीने आष्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईनचे बॉक्स जाधव यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले.

आष्टा तांडा गावातील सार्वजनिक विहिरीत दूषित पाणी गेल्याने ब्लिचिंग पावडर जास्त प्रमाणात टाकल्या गेल्याने नागरिकांना उलटी, जुलाब, मळमळची लागण झाली असून, सदरील सार्वजनिक विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे व आरोग्याची काळजी घ्यावी.
- डॉ. जी.बी. जाधव, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आष्टा