esakal | मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजप महिला आघाडीचा रास्ता रोको

बोलून बातमी शोधा

file photo}

नांदेड महानगरच्यावतीने शिवाजीनगर उड्डाणपुलावर दोन तास महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे (चिखलीकर) व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, महिला जिल्हाध्यक्ष चित्ररेखा गोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.

मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजप महिला आघाडीचा रास्ता रोको
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मंत्री संजय राठोड यांच्या निषेधाचे फलक व भाजपचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने महिला व भाजप कार्यकर्ते शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या मध्यभागी ठाण मांडून बसले. रास्ता रोको केल्यामुळे उत्तर भागातील वाहतूक आयटीयापर्यंत तर दक्षिण भागातील वाहने मुथा चौकपर्यंत खोळंबळी होती. यावेळी आघाडी शासन, संजय राठोड यांच्याविरोधात प्रचंड घोषणा दिल्यामुळे परिसर दणाणून गेला. यावेळी प्रणिता देवरे, प्रवीण साले, देविदास राठोड, चित्ररेखा गोरे, डॉ. शितल भालके, श्रद्धा चव्हाण यांनी राज्यात महिलावर अत्याचार करणाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी करुन निषेध व्यक्त केला. 

यावेळी प्रास्ताविक व संचलन जिल्हा सरचिटणीस ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले. रास्ता रोको आंदोलन चालू असताना अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी थोड्यावेळासाठी रस्ता रोको बंद करुन रुग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट करुन दिली. रुग्णवाहिका गेल्यानंतर पुन्हा रास्ता रोको सुरु ठेवण्यात आला.

या आंदोलनात दिलीप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख, अनिलसिंह हजारी, गंगाधर कावडे, मनोज जाधव,वैजनाथ देशमुख,संजय घोगरे,संतोष परळीकर, सूर्यकांत कदम, अशिष नेरलकर, संतोष क्षिरसागर, अनिल जगताप, कुणाल गजभारे, शंकरराव मनाळकर, अरुण पोफळे, पोर्णिमा बेटमोगरेकर, संगीता झुंजारे, राज यादव, केदार नांदेडकर, अपर्णा चितळे,नलिनी जोशी, साहेबराव गायकवाड, अक्षय अमीलकंठवार, केतकी चौधरी, विशाल शुक्ला, अनिल गाजुला, अनुराधा गिराम, ज्योती कदम, सत्वशीला पांचाळ, वैशाली देबडवार, मंजू स्वामी, सुप्रिया डोणेकर, संगीता कदम, सोनी मठपती, अलका पाटील, अश्विनी सोनुले, सविता बेटके, महादेवी मठपती, श्रीराज चक्रवार, वर्षा चंद्रे, भावना चंद्रे, भाग्यश्री चंद्रे, छाया सोनटक्के, सीमा सुर्वे, वंदना टुमणे, कल्पना गीते,शोभा ठाकूर, रमा लोंढारे, किरण चिंतोरे, अखीला बेग, संगीता साळुंके, छाया केंद्रे, निकिता पांचाळ यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.