esakal | Breaking News : नांदेडात माजी महापौरांसह नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

रविवारी नव्याने आलेल्या चार पॉझिटिव्ह मुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०८ इतकी झाली आहे.

Breaking News : नांदेडात माजी महापौरांसह नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : दिवसभरात रविवारी (ता.२१) एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नव्हता. त्यामुळे नांदेडला काहीसा दिलासा मिळाला असे वाटत होते. परंतु रात्री आठच्या सुमारास पुन्हा नव्याने चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. असल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

रविवारी नव्याने आलेल्या चार पॉझिटिव्ह मुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०८ इतकी झाली आहे. संध्याकाळी कोरोना चाचणी लॅब कडून १४ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यात नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह, एक अहवाल अनिर्णित तर चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. धतोरी गल्ली गाडीपुरा भागातील एक ४० वर्षीय व्यक्ती, रहेमतनगरातील २२ वर्षीय युवक तर बिलालनगरातील ५७ आणि ३७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यात एका माजी महापैरांचा समावेश असल्याचे समजते. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा- असा आहे योगाभ्यासाचा कृतीशील मंत्र ​  

बाधितांंची संख्या ३०८ वर पोहचली

रविवारी (ता. २१) दहा व्यक्ती कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील सहा व विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील चार, अशा एकूण दहा व्यक्तींचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१९ व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ३५ अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे काहिसा दिलासा मिळाला असे वाचक होते. परंतु संध्याकाळी पुन्हा धक्का बसला असून, चार रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित व्यक्तींची संख्या ३०८ वर पोहचली आहे.

आतापर्यंत ३०८ बाधितांपैकी २१९ बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उर्वरित ७५ रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. त्यामध्ये ५० व ५२ वर्षांच्या दोन महिला रुग्ण व ५२ व ५४ वर्षाचे दोन पुरुष यांचा समावेश आहे.

हेही वाचा- Video : वा रे पट्ठ्या..! ‘रेल्वे मोपेड ट्रॉली’ला लावले दुचाकीचे इंजिन ​

७९ व्यक्तींचे स्वॅब तपासणी सुरु

जिल्ह्यात ७४ बाधित व्यक्तींवर उपचार सुरू असून त्यामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४७, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे पाचबाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून सात बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार (ता.२१) ७९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल सोमवारी (ता. २२) सायंकाळपर्यंत प्राप्त होईल. 
 

loading image
go to top