esakal | नांदेड जिल्ह्यात चार लाखापेक्षा अधिक  डोस साठवण्याची क्षमता 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

जिल्हा परिषदेकडे चार लाख ४५ हजार व्हॅक्सिन ठेवण्यासाठीची क्षमता असल्याची माहिती देण्यात आली आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील १३ हजार ४१८ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना पहिला डोस दिला जाणार आहे

नांदेड जिल्ह्यात चार लाखापेक्षा अधिक  डोस साठवण्याची क्षमता 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना प्रतिबंधक ‘लसी’ची ट्रायल पूर्ण झाल्याने केंद्रीय आरोग्य विभागाकडून लस देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, राज्यातील चार जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागाने देखील लस साठवून ठेवण्यासाठी लागणारी सर्व ती तयारी केली असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चार लाख ४५ हजार डोस साठवण्याची क्षमता असलेल्या शीतगृहाचे नियोजन केले आहे. 

पहिल्या टप्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील १३ हजार ४१८ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना पहिला डोस दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व लाभार्थी डॉक्टरांची माहिती ‘कोव्हिन’ नावाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली आहे. मात्र, एकाही लाभार्थ्यास अजुन विशिष्ट कोड दिला गेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा मुहूर्त नेमका कधी लागणार? याबद्दल सांगता येत नाही. 

हेही वाचा- नांदेड : मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्यासाठी १० लाखास फसविले

आरोग्य विभागाच्या विशेष बैठक 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि महापालिका आरोग्य विभागाच्या विशेष बैठक पार पडली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेकडे चार लाख ४५ हजार व्हॅक्सिन ठेवण्यासाठीची क्षमता असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

हेही वाचानांदेड : पालखी सोहळ्यात अंध दाम्पत्याचा आंतरजातीय विवाह सोहळ्याला पंच क्रोशीतील हजारोंची उपस्थिती

प्रत्येक लाभार्थ्यास कोड दिला जाणार 

या कोल्डस्टोरेजमध्ये कोरोना प्रतिबंधक लस ठेवण्यासाठी दोन ते आठ डिग्री तापमान असलेले अद्यावत कोल्ड स्टोरेज आहे. जेव्हा कोरोनाची लस उपलब्ध होईल, तेव्हा प्रत्येक लाभार्थ्यास कोड दिला जाणार आहे. त्यानंतर ज्या सेंटरवर हे लसीकरण होणार आहे, त्या ठिकाणी किमान पाच ते सहा कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. त्यांच्याकडून संबंधीत लाभार्थ्यास दिलेला कोड, तापमान तपासणी, सॅनिटायझेशन अशा सर्व तपासण्या करुन त्यास लसीकरणासाठी पुढे प्रवेश दिला जाणार आहे. लस दिल्यानंतर त्या व्यक्तीस कुठलीही बाधा होऊ नये, म्हणून अर्धातास त्यास वेगळ्या हॉलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी खाली थांबवून ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर घरी सोडण्यात येणार आहे. 

अशी आहे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था   

   नांदेड     ५८
   अर्धापूर   सहा
   भोकर    सहा
   बिलोली    १५
   देगलूर    १४
   धर्माबाद    चार
   हदगाव    २१
   हिमायतनगर   सात
   कंधार    १७
   किनवट    २९
   लोहा    १४
   माहूर    १५
   मुखेड    १९
   मुदखेड    पाच
   नायगाव    नऊ
   उमरी    नऊ


पहिल्या टप्यातील कोरोना प्रतिबंधक लसीचे लाभार्थी 

  नांदेड     पाच हजार २२
  अर्धापूर     ३६५
   भोकर    ४४७
  बिलोली    ५०५
   देगलूर    ६७०
   धर्माबाद    २७४
  हदगाव    ६३२
  हिमायतनगर    ३८१
  कंधार     ६४१
  किनवट     एक हजार ११४
  लोहा    ६८९
  माहूर     ५०५
  मुखेड    ८४३
  मुदखेड     ४०५
  नायगाव    ५५०
   उमरी   ३१७
 असे एकुण लाभार्थी  संख्या   १३ हजार ३६० अशी आहे.