esakal | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सचिन सिरसिल्ला व बंटी लांडगे या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या सचिन सिरसिल्ला व बंटी लांडगे या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहराच्या गोकुळनगर परिसरात शनिवारी (ता. १८) घडली होती. 

एका २७ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ती एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. सचिन नारायण सिरसिला राहणार गंगाचाळ हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. बंटी लांडगे यांनी त्याची माहिती त्या तरुणीला दिली. गोकुळनगरमध्ये आम्ही दोघे फायनान्स चालवतो. असे सांगून आनंद उर्फ बंटी याने त्या तरुणीची सचिनसोबत एक सप्टेंबर २०१९ रोजी भेट घालून दिली. त्यानंतर सचिनने लग्नाचे आमिष दाखवले. ऑक्टोबर २०१९ मध्ये बंटी याच्या चार चाकी गाडीत बसवून सचिनने गोकुळनगरच्या कार्यालयात पीडित युवतीला नेले. आणि इच्छा नसतानाही तिथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने तरुणी मानसिकरीत्या खचून गेली. 

अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला 

आई- वडिलांना कळाले तर समाजात बदनामी होण्याची भीती होती. त्यामुळे सचिनला लग्नासाठी ती पाठपुरावा करत होती. परंतु सचिनने तिला आमिष दाखवत अत्याचार सुरूच ठेवले. ही घटना पीडीत तरुणीने बंटी लांडगे यास सांगितले. तेव्हा तुम्ही तुमचे पहा पण मला तुमच्या प्रकरणात घेऊ नका. नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार करेन अशी धमकी बंटी लांडगे यांनी त्या पीडित तरुणीला दिली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सचिन सिरसिल्ला आणि बंटी लांडगेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहूळे करत आहेत.

हेही वाचा नांदेड : संचारबंदीमध्ये तीन दिवसाची वाढ, नागरिकांनी सहकार्य करावे- प्रशासन

संचारबंदीतही दारूचा पूर

जिल्ह्यात अवैध दारु विक्री वाढली. नांदेडजिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या संचारबंदीचा गैरफायदा घेत अवैध दारु विक्री करणारे आपेल उखळ पांढरे करुन घेत आहेत. रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशाप्रकारे अवैध देशी, विदेशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती रामतीर्थ पोलिसांना मिळताच त्यांनी रविवारी आदमपूर (ता. बिलोली) येथे गुड्डू पाणी फिल्टरच्या समोर छापा मारून १७ हजार ४०० रुपयाची विविध कंपन्यांची विदेशी दारू जप्त केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी ही कारवाई केली असून पोलिसांनी देशी व विदेशी कंपन्यांच्या दीडशे बाटल्या जप्त केल्या आहेत. सदर दारुची किंमत सतरा हजार रुपये असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तसेच शनिवारी (ता. १८) रोजी दारुची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना रामतीर्थ पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडन ३०० बाटल्या जप्त केल्या. यासोबतच उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री गवलवाड यांनी जगदीश लोध यांच्याकडून विदेशी कंपनीची पाच हजाराची दारु तर माधव पिराजी सोळंके यांच्याकडून एक हजार रुपयांची देशी दारु जप्त केली आहे. या दोघांविरुद्ध उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image