esakal | गणेशोत्सव श्रद्धापूर्वक साजरा करा- आमदार बालाजी कल्याणकर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गणेशोत्सव परंपरेप्रमाणे व श्रद्धापूर्वक साजरा करत असताना शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा,

गणेशोत्सव श्रद्धापूर्वक साजरा करा- आमदार बालाजी कल्याणकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी गणेशोत्सव परंपरेप्रमाणे व श्रद्धापूर्वक साजरा करत असताना शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सर्व गणेश भक्तांना केले आहे.

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मतदारसंघात आमदार बालाजी कल्याणकर यांनी पाहणी केली. यावेळी रस्त्यावरील पथदिवे, मलनिस्सारण लाईन साफसफाई करून घेण्याबाबत सूचना केल्या. तसेच बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सूचना दिल्या. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गणेश मंडळांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून शासनाने सांगितलेल्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सव साजरा करण्या संदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांची माहिती यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा नांदेडला कोरोनाने सहा जणांचा मृत्यू ; दिवसभरात १५१ पॉझिटिव्ह

मंदिराभोवती व परिसरात औषध फवारणी 

प्रशासनाच्यावतीने स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून शहरातील रस्त्यावरील पथदिवे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच गणेश मंडळाच्या सूत्रांनी कुठेही कचरा निर्माण होऊ नये यासाठी पूर्वीपासूनच यंत्रणा कार्यान्वित आहे. तरीही मंदिराभोवती व परिसरात औषध फवारणी बाबत आमदार कल्याणकर यांनी महापालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. गणेश मंडळ परिसरात नियमितपणे महानगरपालिकेच्या वतीने निर्माल्य कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी येणार आहे. भाविकांनी देखील काळजी घेऊन कचरा इतरत्र न टाकता एकाच ठिकाणी टाकावा जेणे करून महानगरपालिकेच्या स्वच्छतादूतांना तो सहज उचलता येईल.

गणेशोत्सवा काळात घाण नको

आमदार बालाजी कल्याणकर यांनी शुक्रवारी (ता. २१) मुंबईहून येताच आपल्या मतदारसंघात पाहणी केली. महानगरपालिकेचे विद्युत विभागाचे कार्यालय अधीक्षक रत्नाकर जोशी यांना सोबत घेऊन उत्तर विभागातील सर्व पथदिवे पुढील दोन दिवसात सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच तरोडा बुद्रुक, तरोडा खुर्द, राजकॉर्नर, शिव मंदिर परिसर, श्रीनगर, भाग्यनगर, महाविद्यालय परिसर, महारणा प्रताप चौक, अण्णाभाऊ साठे चौक, दत्तनगर, आयटीआय परिसर आदी भागात कचरा व्यवस्थापनाबाबत पाहणी केली. स्वच्छता विभागाच्या प्रमुखांना सोबत घेऊन पुढील काळातील समस्या बाबत सूचना केलेल्या आहेत. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासमवेत शिवसेनेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
 

loading image