काही रेल्वे रद्द काही उशिराने

दुहेरीकरणाच्या कामामुळे बदल; काही मार्ग बदलून धावणार
 रेल्वे
रेल्वे Sakal

नांदेड - मनमाड ते अंकाई किल्लादरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी यार्ड रि-मोडेलिंग आणि इतर काम पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने काही रेल्वे रद्द केल्या असून, काही उशिराने तर काही मार्ग बदलून धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली.

रेल्वे क्रमांक १२७५३- नांदेड - निझामुद्दीन २८ जूनला नांदेड, औरंगाबाद, मनमाड, खांडवा मार्गे न धावता पूर्णा - हिंगोली - अकोला - भुसावळ मार्गे धावेल. गाडी क्रमांक १२७५४- निझामुद्दीन - नांदेड ही खांडवा - मनमाड - औरंगाबाद - नांदेड मार्गे न धावता खांडवा - भुसावळ - अकोला - हिंगोली - पूर्णा मार्गे धावेल.

पूर्णतः रद्द केलेल्या रेल्वे

गाडी क्रमाक १८५०४- साईनगर शिर्डी - विशाखापट्टणम २४ जूनला पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२०७१- सीएसटी मुंबई - जालना २५ ते २८ जून, गाडी क्रमांक १२०७२- जालना - सीएसटी मुंबई २६ ते २९ जून, गाडी क्रमांक ११४०१- सीएसटी मुंबई - आदिलाबाद २७ व २८ जून, गाडी क्रमाक ११४०२- आदिलाबाद - सीएसटी मुंबई २६ व २७ जून, गाडी क्रमांक ०७१९८- दादर - काझीपेठ २६ जून, गाडी क्रमांक ०७१९७- काझीपेठ - दादर २५ जून, गाडी क्रमांक २२१५२- काझीपेठ - पुणे २६ जून, २२१५१- पुणे - काझीपेठ २४ जून, ०७४९१- जालना - साईनगर शिर्डी २७ व २८ जून, ०७४९२- साईनगर शिर्डी - जालना २७ व २८ जून, ०७४९३- जालना - नगरसोल २४ जून, ०७४९४- नगरसोल - जालना २४ ते २६ जून, आणि ०७४९७- जालना - नगरसोल २६ जून, या गाड्या दिलेल्या तारखांनुसार पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत.

अंशतः रद्द केलेल्या रेल्वे

गाडी क्रमाक ०७७७७- नांदेड - मनमाड २७ जूनपर्यंत, ०७७७८- मनमाड - नांदेड २८ जूनपर्यंत, १७६८८- धर्माबाद - मनमाड २७ व २८ जून, १७६८७- मनमाड - धर्माबाद २७ व २८ जून या रेल्वे रोटेगाव - मनमाड - रोटेगाव दरम्यान तर १७२०६- काकीनाडा - साईनगर शिर्डी २५ ते २७ जून, १७२०५- साईनगर शिर्डी - काकिनाडा २६ ते २८ जून, १७००२- सिकंदराबाद - साईनगर शिर्डी २४ ते २६ जून, १७००१- साईनगर शिर्डी - सिकंदराबाद २५ ते २७ जून या रेल्वे नगरसोल - साईनगर शिर्डी - नगरसोलदरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय १७०६३- मनमाड - सिकंदराबाद २५ ते २८ जून, १७०६४- सिकंदराबाद - मनमाड २४ ते २७ जून या गाड्या नगरसोल मनमाड - नगरसोलदरम्यान दिलेल्या तारखांना अंशतः रद्द केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com