esakal | कोरोना संदर्भात दाखल झालेले तिन हजार गुन्हे लवकरच होणार रद्द; नांदेड पोलिस दलाकडून तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अत्यावश्यक सेवाशिवाय अन्य कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. त्यातही कोरोनासाठी नियमावलीही कठोर केल्या होत्या. परंतु या काळातही अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत होते.

कोरोना संदर्भात दाखल झालेले तिन हजार गुन्हे लवकरच होणार रद्द; नांदेड पोलिस दलाकडून तयारी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात एप्रिल २०२० पासूनच कडक लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवाशिवाय अन्य कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. त्यातही कोरोनासाठी नियमावलीही कठोर केल्या होत्या. परंतु या काळातही अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत होते. तर ठराविक वेळेनंतरही दुकाने सुरु होती. मास्कचा वापर न करणे, शारिरीक अंतर न पाळणे, विनापरवानगी प्रवास अशा प्रकारे कोरोना नियमावलीचे भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात या कालावधीत जवळपास तीन हजार गुन्हे नोंदविण्यात आले होते.

राज्य शासनाने या काळातील सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ व तेलंगणा सिमा आहेत. त्यामुळे या सिमावर्ती भागातून नांदेडात प्रवेश करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी पकडून शहरातच काॅरंन्टाईन केले होते. 

गुन्हे परत कसे घेतले जातात

यापूर्वी सरकार बदलले की राजकीय स्वरुपाचे गुन्हे मागे घेण्यात येत होते. आता कोरोनाच्या काळात साथरोग नियमाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्यावतीने पोलिसामार्फत या गुन्ह्यात तक्रार असतात. त्यामुळे सरकार एक आदेश काढून ते गुन्हे मागे घेत असल्याचे नमूद करते. त्यानंतर हे सर्व गुन्हे रद्द होतात.

जिल्ह्यात कोरोनाच्या काळात किरकोळ कारणावरुन गुन्हे दाखल झालेल्यांना दिलासा मिळाला. विनापरवानगी प्रवासाचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे कोरणा काळात दाखल झाले. प्रवास करण्याला बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही अनेक जण विनापरवानगी प्रवास करत होते. अशा नागरिकांना सिमेवर अडविण्यात आले होते. काहीजण मात्र पोलिसांची नजर चुकवून प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते. परंतु त्यांना शहरात पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. लाॅकडाऊनमध्ये विनापरवानगी प्रवासाचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर जमावबंदी आदेश ठराविक वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने ठेवणे, शारिरीक अंतर न पाळणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रकारही घडले आहे.

हेही वाचानांदेड : विमानतळ पोलिसांनी विदेशी दारुसह दोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त

विनापरवानगी घराबाहेर पडणे- 537, जास्त वेळ दुकान सुरु ठेवणे- 70, विनापरवानगी प्रवास करणे आठशे, जबाबदारी आदेशाचे उल्लंघन करणे 320.

जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रवेश करु नये यासाठी सीमाभागात तपासणी करण्यात आले होते. या ठिकाणी विनापरवानगी शहरात शिरणारे अनेकांवर अनेकांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यात काही ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरात फिक्‍स पॉइंट तयार करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा नागरिकांनी घराबाहेर पडू नये. त्यानंतरही अनेक नागरिकांनी नियमांचा भंग केला. काही जणांनी आंदोलनेही केली. पोलिसांशी हुज्जत घालण्याचा नियम यासंदर्भात जिल्ह्यात कलम 135 आणि 188 नुसार गुन्हा नोंदविण्यात आले होते.
- द्वारकादास चिखलीकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड.

loading image