आचाऱ्याने चालू केला खरमुरे विक्रीचा व्यवसाय

nnd09sgp15.jpg
nnd09sgp15.jpg

तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) : तामसा येथील आचारी संतोष मोपलवार यांची कोरोना महामारीमुळे हातचे काम गेल्याने कुटुंबीयांची होणारी परवड थांबविण्यासाठी संतोष यांनी कुटुंबगाडा चालविणे आवश्यक असल्यामुळे चक्क हातगाड्यावर खरमुरे व गोळ्या विक्रीचा व्यवसाय चालू केला आहे. 

तामसा व परिसरात स्वादिष्ट व रुचकर जेवण बनविणारे आचारी म्हणून संतोष मोपलवार यांची ओळख आहे. पण नेमकी लग्नसराई सुरू होण्याच्या दिवसांमध्ये कोरोनाचे जागतिक संकट उद्भवले. याचा फटका सर्वच क्षेत्रातील व्यवसायिकांना बसला असून आचारी संतोष हे देखील त्याला अपवाद नव्हते. घरची परिस्थिती बेताची असून आचारीपणावर कुटुंबियाच्या पोटाची खळगी भरणे शक्य होते. पण कोरोनामुळे कमाईच्या काळात लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, रिसेप्शन, वाढदिवस इत्यादी प्रासंगिक कार्यक्रमांवर बंदी आली.


हेही वाचा -  कोरोनात आशांची लढाई, आतातरी फलद्रुप प्रत्यक्षात येणार का?
परिणामी संतोष यांच्या हातचे काम गेले व कुटुंबाचे उदरनिर्वाह कसे करायचे? याची चिंता त्यांना भेडसावू लागली. घरचे कर्ते असल्यामुळे जवाबदारी झटकता येत नव्हती. लॉकडॉऊनमध्ये शितीलथा मिळाल्यामुळे संतोष यांनी चक्क खरमुरे व गोळ्या विक्री करून कुटुंबाचे पालनपोषण करण्याचा छोटेखानी व्यवसाय चालू केला. यासाठी अंदाजे पंधरा हजार रुपये खर्च करून चारचाकी गाडा उपलब्ध केला. पंधरा हजार रुपयांचे दुसरे भांडवल गुंतवून खरमुरे, गोळी, गावरान पॉपकॉर्न विक्रीचा फिरता व्यवसाय चालू झाला. 

पुन्हा पूर्वीसारखे सामान्य जीवन 
पाच ते सात प्रकारचे खरमरीत व चविष्ट असे विविध प्रकारचे खरमुरे, फुटाणे, लेमन गोळी शहरभर फिरून विक्री करण्याला नागरिकांकडूनही बरा प्रतिसाद मिळत आहे. व्यवसाय बदललेल्या भूमिकेत संतोष यांना बघून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला. पण परिस्थितीसमोर त्यांनी स्वीकारलेल्या नवीन भूमिकेचे ग्राहक व नागरिकांनी स्वागत केले. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती बदलून पुन्हा पूर्वीसारखे सामान्य जीवन जगणे चालू होईपर्यंत खरमुरे व गोळी विकणे हाच व्यवसाय त्यांना आधार देत आहे. 

आचारी व्यवसाय बंद 
खरमुरे व लेमन गोळी विकून दिवसाकाठी तीनशे ते चारशे रुपये पदरी पडतात. या मुळे आचारी व्यवसाय बंद पडल्यामुळे घर चालविण्याबाबतची काळजी कमी झाली. तीन-चार वर्षांपूर्वीच मूळगावी तामसा येथे आलो. आचारीचा व्यवसाय चांगला चालू होता. कोरोनाचे संकट संपल्यानंतर पुन्हा आचारीपणा करायचा आहे. पण अवघड काळात खरमुरे व गोळ्या विक्रीमुळे कुटुंबाला मिळालेला आधार आयुष्यभर लक्षात राहील असे संतोष मोपलवार, आचारी, तामसा यांनी सांगितले.

संपादन - स्वप्निल गायकवाड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com