esakal | चीनच्या राॅकेटने जगाला पुन्हा एकदा धरले वेठीस...!

बोलून बातमी शोधा

प्रा. श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ
चीनच्या राॅकेटने जगाला पुन्हा एकदा धरले वेठीस...!
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : चीनच्या अंतराळ मोहिमेला एक धक्का बसला आहे. चीननं अवकाशात सोडलेल्या लाँग मार्च ५ ब रॉकेटवरील ( Long March 5b) नियंत्रण सुटल्यानं नवी समस्या निर्माण झाली आहे. रॉकेटवरील निंयत्रण सुटल्यानं ते निर्धारित ठिकाणी पडण्याऐवजी नक्की कुठे पडेल या विषयी पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. रॉकेट पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी (Earth place)पडणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चीन ने पुन्हा एकदा पुढील काही दिवस संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे.

गेल्या वर्षी ५ मे रोजी याच श्रेणीमधील राॅकेटचे पहिले उड्डाण चीनने केले होते. व त्यावरील देखील नियंत्रण सुटल्याने नंतर सहा दिवसांनी पृथ्वीवर कोसळले होते.

दक्षिण चिनी समुद्राच्या पुर्वोत्तर किनारपट्टीवर असलेल्या हायनन भागातील वेन्चांग अंतराळ यानं उड्डाण केंद्रावरुन चिनी अंतराळ संशोधन संस्थेने २९ एप्रिलला २०२१ रोजी लाँग मार्च ५ ब रॉकेट लाँच केलं होतं. या राॅकेटवर चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या २२. ५ टन वजनाचं टायन्हे (Tianhe ) -स्वर्गातील सुसंवाद हे अंतराळ स्थानक उभारण्यासाठीचे आवश्यक प्रमुख माॅड्युल अंतराळात पाठवण्यात आले.

हेही वाचा - परदेशात शिक्षण घ्यायचयं? विद्यार्थ्यांना मिळणार मोफत अचूक सल्ला

या टायन्हे माॅड्युल आजपर्यंत निर्मित सर्वात मोठे माॅड्युल आहे. याची लांबी ५४.४ फुट तर रुंदी १३.८ फुट आहे.

चीनकडून अंतराळात स्वतः चे नव्यानं मोठ्या अंतराळ केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. तिथे जाण्यासाठी या रॉकेटचं लाँचिंग करण्यात आलं होतं. नियंत्रित कार्यक्रमानुसार हे रॉकेट महासागरात कोसळणार होतं. मात्र, त्यावर नियंत्रण सुटलं आहे.

चीनच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाचं वृत्तांकन करणारे पत्रकार अँण्ड्रू जोन्स यांनी ते रॉकेट येत्या काही दिवसात पृथ्वीवर कोसळेल, अशी माहिती दिली आहे. लाँग मार्च ५ ब ची एकुण लांबी १०० फूट तर रुंदी १६ फुट आहे. असे अवाढव्य बहुतांश रॉकेट ही महासागरामध्ये कोसळतात. मात्र, या राॅकेट वरील नियंत्रण सुटले असुन ते गटांगळ्या घेत आहे. नियंत्रण सुटल्यानं ते आता जमिनीवर कोठेही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अँड्रू जोन्स यांच्या अंदाजानुसार हे रॉकेट न्यूयॉर्क, मद्रिद, बीजिंग, दक्षिण चिली, वेलिंग्टन किंवा न्यूझीलंड या भागात कोसळू शकतं. चीनचा अवकाशात नवं अंतराळ स्थानक उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी चीनकडून ११ रॉकेटचं लाँचिंग २०२२ च्या शेवटापर्यंत करण्यात येणार आहे.

येथे क्लिक करा - कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही

२०१८ मध्येही चीनच्या टायगाॅग हा माॅड्युल वरील नियंत्रण सुटलं होतं. चीन आपल्या वेगवेगळ्या अंतराळ मोहिमेत सहभागी होतो व या राॅकेटमुळे पुढील काही दिवस संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे.

लेखक- Shrinivas Aundhkar

Director, MGM's APJ Abdul Kalam Asrtrospace Science Centre, Aurangabad.(MS) India +91 9422171256