सिडकोतील घर हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावणार - अशोक चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोतील घर हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावणार - अशोक चव्हाण

सिडकोतील घर हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावणार - अशोक चव्हाण

नवीन नांदेड : सिडकोतील घर हस्तांतरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. त्यामुळे तो लवकरच सोडविणार असल्याची ग्वाही सार्वजानिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. २८) दिली.

नांदेड वाघाळा महापालिका अंतर्गत सिडको शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन व जाहीर सभा सोमवारी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात पार पडली. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी आमदार अमर राजुरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्री पावडे, आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अब्दुल गफार, सभापती किशोर स्वामी, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, सिडको प्रभारी तथा प्रवक्ते संतोष पांडागळे, नगरसेवक बालाजी जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे, नगरसेविका दिपाली संतोष मोरे, मंगला गजानन देशमुख, माजी नगरसेविका प्रा. डॉ. ललिता शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले की, सिडकोसह नांदेडमध्ये आता विकास थांबणार नाही. नेहमीच मी विकासाला प्राधान्य दिले आहे. येथून पुढेही देत राहणार आहे. मोहन हंबर्डे पंधरा दिवसात आमदार झाले आणि पाहता पाहता कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला, असे म्हणत नागरिकांचे त्यांनी आभार मानले. सिडकोतील स्मशानभूमीचे कामही दर्जेदार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मोहन हंबर्डे यांनी सुरुवातीस दक्षिण विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या विकासकामाची माहिती दिली. यावेळी कॉँग्रसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक, महिला उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळे समाधान

विविध राजकीय सभांमध्ये विविध पक्षाने सिडकोतील मूळ मालकांच्या अनुपस्थित मुद्रांक पेपरवर हस्तांतरणाचा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपआपली भूमिका मांडली होती. परंतु हा प्रश्न सोडवता आला नाही. त्याचे परिणाम हस्तांतरणाचा महत्त्वाचा प्रश्न रेंगाळत पडला. दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Cidco House Will Solve The Problem Ashok Chavan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ashok ChavanNandedcidco