esakal | दिलासादायक : नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

बोलून बातमी शोधा

covid
दिलासादायक : नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 708 अहवालापैकी 702 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे (Rtpcr Testing) 604 तर अँटिजेन तपासणीद्वारे 98 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 81 हजार 986 एवढी झाली असून यातील 71 हजार 265 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी (Discharge in hospital) देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 8 हजार 835 रुग्ण उपचार घेत असून 125 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर (Mask, sanitizer and social distance) आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

(Comfortable: In Nanded district, 25 people died due to corona in last three days)

ता. एक ते तीन मे या तीन दिवसांच्या कालावधीत 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या एक हजार 624 एवढी झाली आहे. ता. एक मे रोजी मुखेड कोविड रुग्णालय येथे मुखेड तालुक्यातील वर्ताळा येथील 70 वर्षाच्या पुरुष, बाऱ्हाळी येथील 42 वर्षाच्या पुरुष, देगलूर कोविड रुगणालय येथे लाईन गल्ली देगलूर येथे 64 वर्षाचा पुरुष, मुखेड तालुक्यातील चोंडी येथील 55 वर्षाचा पुरुष, दिनांक दोन मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उमरी तालुक्यातील गोलेगाव येथील 75 वर्षाची महिला, श्रावस्तीनगर नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 55 वर्षाची महिला, मुखेड तालुक्यातील सकनुर येथील 50 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 75 वर्षाचा पुरुष, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 42 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे विजय नगर नांदेड येथील 49 वर्षाचा पुरुष, मालोदे गल्ली हदगाव येथील 69 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील निळा येथील 56 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 65 वर्षाचा पुरुष, कौठा नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, फरांदे नगर नांदेड येथील 73 वर्षाची महिला, आधार रुग्णालय येथे सरस्वती नगर नांदेड येथील 69 वर्षाचा पुरुष, भगवती रुग्णालय येथे उमरी तालुक्यातील हुंडा येथील 38 वर्षाचा पुरुष, निर्माया रुग्णालय येथे लोहा तालुक्यातील आंबेसांगवी येथील 41 वर्षाचा पुरुष, नारायणा रुग्णालय येथे कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथील 65 वर्षाचा पुरुष, ता. तीन मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे अर्धापूर येथील 67 वर्षाचा पुरुष, नवीन मोंढा नांदेड येथील 41 वर्षाची महिला, विष्णू नगर नांदेड येथील 47 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 49 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.92 टक्के आहे.

हेही वाचा - शस्त्र आपल्या शरीराचे संरक्षण करु शकतील पण मनाचं संरक्षण करु शकत नाहीत. शस्त्राने आत्मबल देतील असे सांगता येत नाही. सकारात्मक विचार, संयम, सहनशीलता, सकारात्मक भावनाच मनाला उभारी आणि आत्मबळ देतात.

सोमवारच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 198, बिलोली 7, हिमायतनगर 14,माहूर 5,उमरी 3, वाशिम 1, नांदेड ग्रामीण 16, देगलूर 33, कंधार 18, मुदखेड 26, यवतमाळ 4, झारखंड 1, अर्धापूर 34, धर्माबाद 28, किनवट 29, मुखेड 55, परभणी 8, हिंगोली 10,भोकर 19, हदगाव 43, लोहा 16, नायगाव 34, लातूर 2 असे एकूण 604 बाधित आढळले.

सोमवारच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 26, बिलोली 1, हिमायतनगर 2, माहूर 2, उमरी 4, , नांदेड ग्रामीण 4, देगलूर 5, कंधार 2, मुखेड 6, यवतमाळ 2, अर्धापूर 8, धर्माबाद 1, किनवट 15, नायगाव 5, बीड 1, भोकर 2, हदगाव 3, लोहा 4, हिंगोली 4, आदिलाबाद 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 98 बाधित आढळले.

सोमवारी जिल्ह्यातील 1 हजार 311 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 18, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 758, धमार्बाद तालुक्यातंर्गत 18, देगलूर कोविड रुग्णालय 6, अर्धापूर तालुक्यातंर्गत 26, उमरी तालुक्यातंर्गत 31, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 1,हैद्राबाद येथे संदर्भित 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 31, मुखेड कोविड रुग्णालय 44, नायगाव तालुक्यातर्गत 7, किनवट कोविड रुग्णालय 78, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 4, बिलोली तालुक्यातंर्गत 5, मुदखेड कोविड केअर सेटर 16, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 12, हदगाव कोविड रुग्णालय 13, कंधार तालुक्यातंर्गत 10, माहूर तालुक्यातंर्गत 7, लोहा तालुक्यातंर्गत 49, भोकर कोविड केअर सेंटर 38, खाजगी रुग्णालय 138 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .

येथे क्लिक करा - नांदेड : आरडीएक्स म्हणून जप्त; सिंदी बनविण्याचे रसायन असल्याचा संशय, रेल्वे पोलिसांची उडाली झोप, पोलिस अधीक्षकांसह एटीएस पथकाकडून चौकशी

सोमवारी 8 हजार 835 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 163, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 91, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 172, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 47, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 81, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 81, देगलूर कोविड रुग्णालय 35, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 19, बिलोली कोविड केअर सेंटर 83, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 19, उमरी कोविड केअर सेंटर 28, माहूर कोविड केअर सेंटर 24, भोकर कोविड केअर सेंटर 8, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 48, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 37, कंधार कोविड केअर सेंटर 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर 43 , मुदखेड कोविड केअर सेंटर 13, अर्धापूर कोविड केअर सेंटर 22, बारड कोविड केअर सेंटर 25, मांडवी कोविड केअर सेंटर 9, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 4, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 40, एनआरआय कोविड केअर सेंटर 46, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 116 , नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 3 हजार 414, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 360, खाजगी रुग्णालय 1 हजार 789, असे एकूण 8हजार 835 उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील कोरोना मिटर

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 68 हजार 717

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 77 हजार 33

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 81 हजार 986

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 71 हजार 265

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 624

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.92 टक्के

सोमवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-26

सोमवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-60

सोमवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-380

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 8 हजार 835