मराठी भाषेच्या विकासासाठी ‘सप्तरंगी’च्या माध्यमातून कटिबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषेच्या विकासासाठी ‘सप्तरंगी’च्या माध्यमातून कटिबद्ध
मराठी भाषेच्या विकासासाठी कटिबद्ध

मराठी भाषेच्या विकासासाठी ‘सप्तरंगी’च्या माध्यमातून कटिबद्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वस्तरातून मागणी होत आहे; तसे प्रयत्नही होत आहेत. भाषा विकासासाठी मराठी भाषेत अनेकानेक संशोधने झाली पाहिजेत. मराठीतील विविध बोली भाषेतील लोकवाङमयाचे इंग्रजीत भाषांतर झाले पाहिजे. मराठी भाषेच्या विकासासाठी आम्ही सप्तरंगी साहित्य मंडळाच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याची ग्वाही युवा कवी प्रा. यशवंत भवरे यांनी दिली.

हेही वाचा: औरंगाबाद : सय्यद मतीन राष्ट्रवादीतूनही निलंबित

तथागतनगर येथे सप्तरंही साहित्य मंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य महासचिव पांडूरंग कोकुलवार, राज्य उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, राज्य कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, राज्य सहसचिव कैलास धुतराज, राज्य कार्याध्यक्ष मारोती कदम, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर उपस्थित होते. कार्याध्यक्ष मारोती कदम यांनी कंधार तालुक्यातील गोणार येथे मंडळाचे एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलन होणार असल्याचे सांगितले.

ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी ग्रामीण कवी, साहित्यिकांना या साहित्य संमेलनाच्या मंचावर संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन रणजीत गोणारकर यांनी केले. कैलास ध्रुतराज यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी कार्यकारिणीचे लक्ष्मण लिंगापुरे, उल्हास काटे, गोविंद बामणे, श्रद्धा पाटील, दीक्षा सरोदे, ऋतुजा जाधव, निखिल कांबळे, गंगाधर पावडे, शैलेश कांबळे, दुधमल, सुनिता कावळे, संगिता कांबळे, भीमराव भवरे, शांतीमुनी भरणे आदींचे सहकार्य मिळाले.

loading image
go to top