biloli aadnolan.jpg
biloli aadnolan.jpg

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे


बिलोली, हिमायतनगर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती फारच कमी झाल्या आहेत. असे असतानासुद्धा केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल व इंधनाचे दर वेळोवेळी वाढवून जनतेची लूट चालवल्याचा निषेध व्यक्त करून ही लूट थांबवून पेट्रोल, डिझेल व इंधनाची दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करीत बिलोली व हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी (ता.सात) धरणे आंदोलन, निदर्शने करण्यात आली.

यावेळी तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यातच लॉकडाउनच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोलमडले असून, मोदी सरकारतर्फे सतत पेट्रोल, डिझेलचे भाव वाढविले जात आहे. यामुळे जनतेची चांगलीच कोंडी होत आहे. काही भागात चक्क पेट्रोलपेक्षा डिझेल अधिक भावाने विकले जात आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती लक्षात घेऊन केंद्र सरकारने दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा व दरवाढ मागे घ्यावी. अन्यथा रस्त्यावर उतरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी बिलोलीत आमदार रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, उपसभापती शंकर यंकम, प्रकाश पाटील बडुरकर, वलिओद्दीन फारुखी, उपनराध्यक्ष मारोती पटाईत, सचिव पांडुरंग रामपुरे, नगरसेवक जावेद कुरेशी, गटनेते नागनाथ तुम्मोड, जनार्दन बिराजदार, पंचायत समिती सदस्य हानमंत इंगळे, दिलीप पांढरे, नितीन देशमुख आदी सहभागी होते.

हिमायतनगरात तहसीलदारांना निवेदन
कोरोनाच्या महामारीने सध्या सर्वत्र हाहाकार केला असून, या संकटात लाखो लोकांचे रोजगार हिरावले आहेत. उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाही, अशा परिस्थितीतही पेट्रोल, डिझेलच्या महागाईने आणखी जनतेवर संकट ओढावले आहे. सदरील दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी आमदार माधव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास पाटील देवसरकर, सुभाष राठोड, गणेश शिंदे, माजी नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद, परमेश्वर गोपतवाड, शहराध्यक्ष संजय माने, मिर्झा मुनवर बेग, शिवाजी माने, रामराव सूर्यवंशी, प्रवीण कोमावार, शेख रहिम मीरासाब, फेरोज कुरेशी, परसराम ढाले, दिलीप पार्डीकर, पंचफुलाबाई लोणे, श्‍याम जक्कलवाड, गणेशराव आरबटवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com