esakal | सुप्रिम कोर्टाचा खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

सुप्रिम कोर्टाच्या निकालामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा मार्ग झाला मोकळा

सुप्रिम कोर्टाचा खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना दिलासा

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. तत्पुर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडणुकीत सहभाग घेता येवू नये यासाठी विरोधकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या ठिकाणी चिखलीकरांच्या बाजुने निकाला आला. त्यानंतरही विरोधक शांत बसले नाहीत. त्यांनी सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठावला असता तेथेही खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना गुरुवारी (ता.१८ मार्च) दिलासा मिळाल्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

नांदेड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. परंतु, खासदार प्रताप पाटील चिखलीकर व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय वर्चस्वातून यावेळी होणारी नांदेड जिल्हा बॅंकेची निवडणूक राज्यभर चर्चेत आली आहे. मागील कार्यकाळात खासदार चिखलीकर यांनी सेना, भाजप व राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेवून जिल्हा बॅंकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. परंतु राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेची सत्ता खासदार चिखलीकरांच्या ताब्यात जावू नये यासाठी अप्रत्यक्षरित्या व्युहरचना आखली. जिल्हा बॅंकेची मतदारयादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच खासदार चिखलीकर यांचे मतदार यादीतील नाव वगळण्यात यावे, अशी तक्रार एका कार्यकर्त्याने विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केली होती.

हेही वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था पुन्हा कोलमडली

तेव्हा मतदार यादीतून नाव रद्द करण्याचा निर्णय देताच याविरुद्ध खासदार चिखलीकरांनी हायकोर्टात दाद मागितली होती. येथे हायकोर्टाने दिलासा देत मतदारयादीतील नाव कायम ठेवले. परंतु, या निर्णयाविरुद्ध पुन्हा तक्रारकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. प्रारंभीची सर्व प्रक्रिया पाहता गुरुवारी (ता.१८) सुप्रिम न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीअंती तक्रार कर्त्याची याचिका फेटाळून लावत खासदार चिखलीकर यांचे जिल्हा बॅंकेच्या मतदारयातील नाव कायम ठेवत मोठा दिलासा दिला आहे. खासदार चिखलीकर यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार खासदार चिखलीकर यांच्यावतीने अॅड. ब्रिजकिशोर व अॅड. शिवाजीराव जाधव यांनी बाजू मांडली तर तक्रारकर्त्यांच्या बाजूने प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली आहे.
 

नेहमी सत्याचाच विजय होतो
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निवाड्यावर मी समाधानी असून सत्याचा विजय झाला आहे.
- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार

नांदेड जिल्ह्यातील इतरही बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top