नायगांव तालुक्यात विजेच्या धक्क्याने बांधकाम मजुराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मयत प्रशांत बेंद्रीकर

नायगांव तालुक्यात विजेच्या धक्क्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने (Leabour death in electric shok) बुधवारी (ता. १२) सकाळी मृत्यू झाल्याची घटना लोहगाव येथे घडली. आर्थिक तडजोडीत तब्बल पाच तास मृतदेहाची विटंबना झाली. नंतर शवविच्छेदन करण्यासाठी लोहगावला वैद्यकीय अधिकारी नसल्याने पोलिसांना मृतदेह घेवून बिलोली व कुंडलवाडी (Biloili, neigaon and kundalwadi police)असा प्रवास करावा लागल्याने जगण्याने तर छळलेच पण मृत्यूनंतरही सुटका झाली नसल्याचा प्रत्यय यानिमित्ताने आला आहे. (Construction worker dies due to electric shock in Naigaon taluka)

बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे मुख्य रोडवर एका व्यापाऱ्याचे बांधकाम चालू आहे. या बांधकामावर नायगाव तालुक्यातील बेटकबिलोली येथील ३० वर्षाचा तरुण प्रशांत संभाजी बेंद्रीकर हा पोटाची खळगी भरण्यासाठी काम करत होता. पण बुधवारी तो कामावर आला व लोखंडी सिडीचे काम असल्याने तो लोखंडी सिडी घेवून पायऱ्या उतरत असताना या लोखंडी सिडीचा ११ केव्हीच्या तारांना स्पर्श झाला. त्यामुळे प्रशांत जागीच गतप्राण झाला.

हेही वाचा - International Nurses Day-2021: रुग्णांना धीर देऊन त्यांच्यावर मायेची फुंकर घालणारी कर्तव्यदक्ष स्त्री. शहरातील स्वतंत्र सैनिक मैनाबाई पोपसेटवार (वय 95) यांचे लसीकरण करताना शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिसेविका मीनाक्षी गोस्वामी आणि त्यांच्या सहकारी

सदरच्या घटनेची माहिती समजताच रामतीर्थ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील सोपस्कार पार पाडण्यासाठी पोलिस हवालदार पठाण हे लोहगाव येथे आले असता नातेवाईकांनी मृतदेह उचलू देण्यास नकार दिला. तर काही नातेवाईक सदर प्रकरणी अर्थिक तडजोडीत लागले पण रक्कम किती यावर घोडे आडल्याने प्रशांतचा मृतदेह तब्बल पाच ते सहा तास तेथेच पडून होता. अखेर तीन वाजताच्या दरम्यान तडजोडी झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह लोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रामतीर्थ पोलिसांनी बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लोहगावला प्राथमिक आरोग्य केंद्र असतांना बिलोलीला का आलात असा प्रश्न उपस्थित केला आणि शवविच्छेदन करण्यास नकार दिला.

बिलोली येथेही शवविच्छेदन झाले नसल्याने पोलिस हतबल झाले होते. लोहगाव येथील वैद्यकीय अधिकारी कुंडलवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असल्याची माहिती मिळाली त्यामुळे शेवटी मृतदेह कुंडलवाडीला घेवून जावा लागला. सकाळी साडेनऊ वाजता मृत्यू पावलेल्या तरुणाच्या मृतदेहाची तडजोडीमुळे पाच तास विटंबना तर झालीच पण शवविच्छेदनासाठी वैद्यकीय अधिकारी वेळेवर मिळाले नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या गोरगरिबांच्या नशीबी मृत्युनंतर सुखाने जळण्याचे भाग्य नसावे याचे आश्चर्य तर वाटते परंतु जगण्याने तर छळलेच पण मृत्यूनंतरही सुटका झाली नसल्याचा प्रत्यय यानिमित्ताने आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: Construction Worker Dies Due To Electric Shock In Naigaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top