esakal | अर्धापुरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळित, सोयाबीन धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

soyaban.jpg

अर्धापुरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळित, सोयाबीन धोक्यात

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा शहरासह (Ardhapur) तालुक्यात सोमवारी (ता.१३) संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. या संततधार पावसाचा खुप मोठा फटका सोयाबीन पिकाला बसणार आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून पिके पिवळी पडत आहे. अर्धापूर तालुक्यात गेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांना खूप मोठा फटाका बसला आहे. या झालेल्या (Nanded) नुकसानीची पाहणी सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांनी केली. बाधित गावातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाल्याने खरिपाच्या पिकांना खूप मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा: शेतकऱ्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मटका,सट्टा सुरू करण्याची मागणी

शहरातील सखल भागात पाणी साचले असून शहर जलमय झाले आहे. नगरपंचायत कार्यालयासमोर पाण्याचा तळे साचले आहे. संततधार पावसामुळे शेतीचे खुप मोठे नुकसान झाले. खरिपाच्या पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत.

loading image
go to top