कोरोना ब्रेकिंग - नांदेडला बुधवारी चार महिला रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ३९१ 

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 1 July 2020

नांदेडला दररोज कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण आढळून येत असून बुधवारी (ता. एक जून) सकाळी चार महिला रुग्ण आढळून आले असून आता जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ३९१ झाली आहे. आत्तापर्यंत १७ जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २८३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

नांदेड - बुधवारी (ता. एक) सकाळी १५ प्राप्त झालेल्या १५ अहवालापैकी पाच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३९१ झाली आहे. 

कोरोना विषाणूसंदर्भात बुधवारी (ता. एक) सकाळी आलेल्या अहवालानुसार चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दोन रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २८३ एवढी झाली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. २९) रात्री नांदेडमधील नवीन कौठा येथील एका ५३ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

हदगाव, मुखेड तालुक्यात रुग्ण 

Advertising
Advertising

दिवसभरात आलेल्या चार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोन रुग्ण नांदेड शहरातील तर दोन ग्रामिण भागातील आहेत. छत्रपती चौक येथील पुरुष (वय ५७), शिवाजीनगर येथील महिला (वय ३२) तसेच पळसा (ता. हदगाव) येथील १६ वर्षाची युवती आणि बेटमोगरा (ता. मुखेड) येथील ५६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. संध्याकाळी सात वाजता आलेल्या अहवालात बाफना येथील एक पुरुष (वय ६४), आंबेडकर नगर येथील एक मुलगी (वय पाच), आंबेडकर नगर येथील एक पुरुष (वय ३३), असर्जन येथील तीन महिला (वय ३७, दहा आणि ११), असर्जन येथील एक पुरूष (वय ४२), विनायकनगर येथील एक महिला (वय ३४), वसंतनगर येथील एक पुरुष (वय ५२) तसेच जिल्ह्यातील मुक्रमाबाद येथील एक पुरुष (वय २०), एक महिला (वय ३८) यांचा समावेश आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - 
 
दहा रुग्णांची प्रकृती गंभीर

उपचार सुरु असलेल्यांपैकी दहा रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यामध्ये चार महिला आणि सहा पुरूषांचा समावेश आहे. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पंजाब भवन कोविड सेंटर तसेच जिल्ह्यातील मुखेड, हदगाव आणि मुखेड कोविड सेंटर येथे आणि जिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद येथे सात तर सोलापूर येथे एक रुग्ण संदर्भित करण्यात आले आहेत.