esakal | कोरोना ब्रेकिंग - नांदेडला कोरोनाचा पंधरावा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेडला गुरूवारी (ता. २५ जून) सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या अहवालात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचबरोबर गुरूवारी १९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उमर कॉलनीतील ५४ वर्षीय बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२५) रात्री घडली.

कोरोना ब्रेकिंग - नांदेडला कोरोनाचा पंधरावा बळी

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाचे दररोज रुग्ण सापडत असून गुरूवारी (ता. २५ जून) सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या अहवालात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर दुसरीकडे उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी १९ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्यामुळे ते कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उमर कॉलनीतील ५४ वर्षीय बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२५) रात्री घडली.

शहरातील उमर कॉलनीतील ५४ वर्षीय बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२५) रात्री घडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण मृत्यू १५ झाले आहेत. सदरिल व्यक्तीचा अहवाल ता.सात जून रोजी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नसल्याने त्यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्‍या वतीने सांगण्यात आले. गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाच वाजता ३६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१ अहवाल निगेटिव्ह आले असून पाच अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ३३१ झाली आहे. 

हेही वाचा - मियावाकी वृक्षलागवडीसाठी पुढाकार घ्यावा.....कोण म्हणाले ते वाचा -

चिखलभोसी, देगलूरचे रुग्ण
आज आढळून आलेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकजण नांदेड शहरातील विसावानगर भागातील असून तो १७ वर्षाचा युवक आहे. ग्रामिण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून चिखलभोसी (ता. कंधार) येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. त्यात एक २६ वर्षाचा पुरुष आणि १९ व २६ वर्षाच्या दोन स्त्री आहेत. त्याचबरोबर देगलूर येथील एक ५९ वर्षाची स्त्री आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

गुरुवारी १९ रुग्ण झाले बरे
गुरूवारी दिवसभरात १९ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून घरी पाठविण्यात आले आहे. नांदेडच्या पंजाब भवन कोविड सेंटर येथील १९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ३३१ रुग्णांपैकी २६७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईचा अशोक चव्हाण यांचा इशारा 

पाच रुग्णांची प्रकृती गंभीर
सध्या 49 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यापैकी पाच रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये ५० व ५५ वर्षाच्या दोन स्त्री, ३८, ६५ आणि ७५ वर्षाचे तीन पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. 49 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यापैकी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे १३ रुग्ण, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ३२ रुग्ण, मुखेड कोविड सेंटर येथे एक रुग्ण तर तीन रुग्ण औरंगाबाद आणि एक रुग्ण सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. दरम्यान, गुरूवारी (ता. २५) १२२ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या शुक्रवारी (ता. २६) सायंकाळपर्यंत प्राप्त होतील.