esakal | कोरोना ब्रेकिंग : नांदेड जिल्ह्यात पाच महिण्यात दीड लाख नागरिकांचे सर्वेक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आज घडीला पाच हजारावर रुग्ण संख्या पोहचली आहे. जिल्ह्यात परजिल्ह्यातून, देशातून आणि राज्यातून आलेल्या एक लाख ५० हजार २०० नागरिकांचे सर्वेक्षण केले.

कोरोना ब्रेकिंग : नांदेड जिल्ह्यात पाच महिण्यात दीड लाख नागरिकांचे सर्वेक्षण

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाची साथ मार्च महिण्याच्या ता. २२ पासून सुरु झाली. पहिला रुग्ण हा एप्रीलमध्ये पिरबुऱ्हाननगरमध्ये सापडला. त्यानंतर मात्र ही संख्या लक्षणीय वाढत गेली. आज घडीला पाच हजारावर रुग्ण संख्या पोहचली आहे. जिल्ह्यात परजिल्ह्यातून, देशातून आणि राज्यातून आलेल्या एक लाख ५० हजार २०० नागरिकांचे सर्वेक्षण केले. पाच महिण्यात एवढ्या नागरिकांचे सर्वेक्षण करणारा हा मराठवाड्यातील दुसरा जिल्हा असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाबाबत शुक्रवारी (ता. २१) एकुण 861 अहवालापैकी  638 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण  बाधितांची संख्या आता चार हजार 821 एवढी झाली असून यातील दोन हजार 847 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण एक हजार 771 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 136 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

मृत्यूंचा आकडा वाढत आहे

गुरुवार (ता. 20) ऑगस्ट रोजी वाजेगाव नांदेड येथील 41 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे व शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी कैलासनगर नांदेड येथील 58 वर्षाच्या एका महिलेचा, कंधार तालुक्यातील नवीन मोंढा येथील 56 वर्षाचा एक पुरुष, चिखली खु. नांदेड येथील 66 वर्षाचा एक पुरुष व शक्तीनगर नांदेड येथील 68 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर गुरुद्वारा गेट नं. 4 बडपुरा नांदेड येथील 53 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्य झाला. 

हेही वाचा  गणेशोत्सव श्रद्धापूर्वक साजरा करा- आमदार बालाजी कल्याणकर

44 कोरोना बाधित व्यक्तींना सुट्टी 

आज बरे झालेल्या 44 कोरोना बाधितांमध्ये आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड सेंटर येथील 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 1, बिलोली कोविड सेंटर 1, कंधार कोविड सेंटर 4, किनवट कोविड सेंटर 2, आयुर्वेदिक शासकीय कोविड रुग्णालय सेंटर 1,  देगलूर कोविड सेंटर 18, पंजाब भवन कोविड सेंटर 2, मुखेड कोविड सेंटर 13, नायगाव कोविड केअर सेंटर 1 असे एकूण 44 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 
  
आरटीपीसीआर तपासणीद्वारे

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 18, देगलूर तालुक्यात 17, हदगाव तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 18, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 12, हिंगोली एक असे एकुण 74 बाधित आढळले. 

 अँटिजेन तपासणीद्वारे 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 27, बिलोली तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 9, मुदखेड तालुक्यात 2, उमरी तालुक्यात 15, अर्धापूर तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 9, धर्माबाद तालुक्यात 5, हिंगोली 2 असे एकुण 77 बाधित आढळले. 

येथे आहेत कोरोना बाधितावर उपचार सुरु

जिल्ह्यात 1 हजार 771 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 178, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 851, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 45, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 41, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 37, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 100,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 55, लोहा कोविड केअर सेंटर येथे 54, हदगाव कोविड केअर सेंटर 31, भोकर कोविड केअर सेंटर 18,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 28, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 103, किनवट कोविड केअर सेंटर येथे 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 8, मुदखेड कोविड केअर सेटर 24,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 9, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 23, बारड कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 20, खाजगी रुग्णालयात 129 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 4, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

येथे क्लिक कराशेतकऱ्यांना गुड न्यूज : या परिमंडळातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार दिवसा विज

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 227,
घेतलेले स्वॅब- 33 हजार 303,
निगेटिव्ह स्वॅब- 26 हजार 533,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 151,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 821,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 49,
एकूण मृत्यू संख्या- 168,
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 847,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 771,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 270, 
आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 136. 

मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.