esakal | नांदेडात कोरोनाचे थैमान सुरुच : रविवारी ६६ बाधीत, २४ बरे तर दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ९३५ वर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आजच्या अहवालात एकूण ४७८ अहवालापैकी ४०२ अहवाल निगेटिव्ह तर ६६ कोरोना बाधीत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ९३५ एवढी झाली आहे. यातील ५०० बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे

नांदेडात कोरोनाचे थैमान सुरुच : रविवारी ६६ बाधीत, २४ बरे तर दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ९३५ वर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्ह्यात रविवार (ता. १९) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ६६ व्यक्ती बाधित तर दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. आजच्या अहवालात एकूण ४७८ अहवालापैकी ४०२ अहवाल निगेटिव्ह तर ६६ कोरोना बाधीत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ९३५ एवढी झाली आहे. यातील ५०० बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ह्या तपासण्या आरटीपीसीआर व अॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे करण्यात आल्या.

रविवारी (ता. १८) जुलै रोजी २४ बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मुखेड कोविड केअर सेंटर येथील सहा, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील तीन बाधित, जिल्हा रुग्णालयातील दोन, पंजाब भवनमधील १३ असे एकुण २४ बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

हेही वाचा - गुरुद्वारा बोर्डाचे दोन सदस्य का झाले निलंबित... वाचा सविस्तर ​


दोन बाधीत रुग्णांचा मृत्यू

रविवार (१८ जुलै) रोजी रात्री देशमुख काॅलनी नांदेड येथील ६५ वर्षीय महिलेचा व ता. मानवत जिल्हा परभणी येथील एका ६४ वर्षीय उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या ४६ एवढी झाली
आहे.
 
या भागातील रुग्ण बाधीत

नवीन बाधितांमध्ये नांदेडच्या गुरु गोविंदसिंग विमानतळ एक, श्रीनगर दोन, सराफा चौक एक, पिरबुऱ्हाननगर एक, सोमेश काॅलनी ११, विष्णुनगर एक, शहिदपूरा दोन, जुना मोंढा दोन, खालसा काॅलनी एक, पााठकगल्ली सराफा दोन, देगलूर नाका एक, माळवतकर काॅलनी जुना कौठा एक, मिल गेट एक, विसावानगर एक, विष्णु काॅम्पलेक्स एक, शहिदपूरा तीन, बळीरामपूर दोन, गाडीपूरा एक, गोविंदनगर एक, गाडीपूरा दोन, विष्णुपीरी एक,  कोल्हेबारगाव ता. बिलोली एक, खैरका ता. मुखेड दोन, रावी ता. मुखेड एक, मानसपुरी कंधार एक, फुलवळ कंधार आठ, वसमत (हिंगोली) दोन, श्रीनगर हिंगोली एक, आंबेडकरनगर एक, विष्णुनगर तीन, गाडीपूरा एक, साईनगर इतवारा दोन, पांडूरंगनगर ए्क, श्रीकृष्णनगर गंगाखेड दोन.

रविवारी (ता. १९) ३८९ पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील ३१ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात १७ महिला बाधित व १४ पुरुष बाधित आहेत.

बाधितांवर येथे आहेत उपचार

आज रोजी एकुण ९३५ बाधितांपैकी ४६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ७७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १४४, मुखेड कोविड केअर सेंटर येथे २७, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, जिल्हा रुग्णालय येथे २४, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १२, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे पाच, गोकुंदा किनवट कोविड केअर सेंटर येथे दोन, हदगाव कोविड केअर सेंटर येथे एक, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १७ बाधित, माहूर कोविड केअर सेंटर एक, गोकुंदा तीन, लोहा ११, कंधार दोन, धर्माबाद तीन, नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात ४२ बाधित व्यक्ती उपचार घेत असून सहा बाधित औरंगाबाद येथे संदर्भित सात, निझामबाद एक आहेत.

येथे क्लिक कराकोरोना : जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत करणार- अशोक चव्हाण

कोरोना मिटर

सर्वेक्षण- १ लाख ४७ हजार २०१,
घेतलेले स्वॅब- १० हजार १०२,
निगेटिव्ह स्वॅब- ८ हजार २७५
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-६६
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ९३५,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- ५,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- ०,
मृत्यू संख्या- ४६,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ५००,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ३८९,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या २०८ एवढी संख्या आहे.

loading image