नांदेड जिल्हात ५२० अहवालांपैकी बुधवारी दोन कोरोनाबाधित

दिवसभरात एकजण बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली
Corona Update
Corona Updateesakal

नांदेड : जिल्ह्यात बुधवारी (ता. २३) प्राप्त ५२० अहवालांपैकी केवळ दोन अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दिवसभरात एकजण बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली. आजच्या घडीला आठ रुग्ण उपचार घेत आहे.

जिल्ह्यातील आजवर एकुण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ७९७ झाली असून यातील एक लाख ९७ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६९२ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका हद्दीत दोन कोरोनाबाधित आढळले आहेत. आज जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण एक कोरोनाबाधिताला औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुटी देण्यात आली. उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृह विलगीकरण तीन, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणात पाच असे एकुण आठ व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर

एकूण बाधित ः एक लाख दोन हजार ७९७

एकूण बरे ः एक लाख ९७

एकूण मृत्यू ः दोन हजार ६९२

बुधवारी बाधित ः दोन

बुधवारी बरे ः एक

बुधवारी मृत्यू ः शून्य

उपचार सुरू ः आठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com