Nanded Corona Update: जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट

ध्या एकूण ५१ रुग्ण उपचार घेत असून यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे
corona updates in nanded
corona updates in nandedcorona updates in nanded

नांदेड: Nanded covid 19 updates: जिल्ह्यात मंगळवारी (ता. २७) प्राप्त एक हजार २१३ अहवालापैकी सहा अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील चार कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. सध्या एकूण ५१ रुग्ण उपचार घेत असून यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार १६६ एवढी झाली असून यातील ८७ हजार ४६० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये मुखेड तालुक्यांतर्गत एक, देगलूर - एक, लोहा एक, नांदेड महापालिका एक, नांदेड ग्रामीण एक, कंधार एक असे एकूण सहा बाधित आढळले. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १२८ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे १४४ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

corona updates in nanded
प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणत विधवेला बेदम मारहाण

नांदेड कोरोना मीटर
एकुण स्वॅब- ६ लाख ५१ हजार १९८
एकुण निगेटिव्ह - ५ लाख ४९ हजार ९३
एकुण पॉझिटिव्ह - ९० हजार १६६
एकूण बरे - ८७ हजार ४६०
एकुण मृत्यू -२ हजार ६५५
आज प्रलंबित स्वॅब - ४३
उपचार सुरू - ५१
अतिगंभीर प्रकृती - तीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com