esakal | कोरोनाचा मारा त्यात चढला उन्हाचा पारा ; नांदेड पोहचले तापमान ४४ अंश डिग्रीवर
sakal

बोलून बातमी शोधा

sun hot

कोरोनाचा मारा, त्यात चढला उन्हाचा पारा ; नांदेड पोहचले ४४ अंशावर

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः गत दोन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. सोमवारी (ता.२६) नांदेड जिल्ह्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे आधीच कोरोनाचा मारा त्यात चढला उन्हा पारा अशी म्हणण्याची वेळ नांदेडकरांवर आली आहे.

उन्हासोबतच दिवसभर दमट वातावरण असल्यामुळे उकाडा अधिकच जाणवत असून, नांदेडकर घामाघुम होत आहेत. गतवर्षी आणि यंदाही नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. खास करून मार्च, एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके जाणवत असतात. कोरोनाच्या संकटामुळे उन्हाळ्याच्या तीव्रतेचा सर्वांनाच थोडा विसर पडत आहे.

हेही वाचा - परभणीकरांनो प्राणवायुसाठी आता 'नो टेन्शन'

यंदा एप्रिलमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या जशी वाढत आहे, तशी उन्हाची तीव्रताही जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी हवामाने खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सध्या कोरोनामुळे शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. यामुळे नागरिकांना घरातच पंखे, कुलरपुढे बसून राहावे लागत आहे. गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे व दमट वातावरण निर्माण झाले. यामुळे दुपारी आणि रात्रीच्या वेळी घामाघुम व्हावे लागत आहे.

मे महिन्यात सर्वाधिक उष्ण लहरी ः

बेसुमार जंगलतोड आणि पाण्याचा उपसा, शहरीकरण आणि प्रदूषणाचे परिणाम आता मानवाला भोगावे लागत आहेत. यामुळे तापमानमध्ये वाढ होत असल्याने यावर्षी एप्रिल-मे महिन्यात उष्ण लहरी मनुष्याला भाजून काढणार आहेत. अतितापमान आणि उष्ण लहरींचे वर्ष म्हणून यंदाच्या वर्षाची नोंद होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मे महिन्याच्या शेवटी उष्ण लहरी वाहण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता ः

विशेष म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली होती. आता एप्रिल महिन्याच्या शेवटी गेल्या दोन चार दिवसात तापमानाचा पारा ४० ते ४४ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचला आहे. पुढील मे महिन्यात तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविलेली आहे. यामुळे आधीच ‘कोरोनाचा मारा त्यात उन्हाचा चढला पारा’ अशी म्हणण्याची वेळ नांदेडकरांवर आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image