esakal | सावधान : ‘कोरोना’चा पाश आवळला जातोय...
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

सुरवातीचे तीन महिने कंधार कोरोनापासून मुक्त होते. परंतु आता कोरोनाने शहर व परिसरात शिरकाव केला आहे. मागच्या १५ दिवसात ११ जणांना कोरोनाची लागण झाली. हा आकडा मोठा नाही, पण नागरिकांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनाने उशिरा का? होईना कंधारवर पाश आवळायला सुरवात केली आहे. हा पाश घट्ट होऊ नये यासाठी नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.

सावधान : ‘कोरोना’चा पाश आवळला जातोय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


कंधार, (जि. नांदेड) : सुरवातीचे तीन महिने कंधार कोरोनापासून मुक्त होते. परंतु आता कोरोनाने शहर व परिसरात शिरकाव केला आहे. मागच्या १५ दिवसात ११ जणांना कोरोनाची लागण झाली. हा आकडा मोठा नाही, पण नागरिकांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनाने उशिरा का? होईना कंधारवर पाश आवळायला सुरवात केली आहे. हा पाश घट्ट होऊ नये यासाठी नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.

हेही वाचा -  नांदेडमध्ये बोगस सोयाबीन उत्पादक कंपनीवर दुसरा गुन्हा दाखल


देशभर कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. अनेक ठिकाणी उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. सरकार, आरोग्य विभाग सतर्क असूनही कोरोनाचा फैलाव थांबविण्यात यश येत नाही. पाच लॉकडाऊन संपल्यानंतर दुसरे अनलॉक सुरू आहे. व्यवसाय, व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी कोरोनाची भीती मात्र कायम आहे. कामे केल्याशिवाय पर्याय नसल्याने नागरिकांना सूट देण्यात आली खरी, पण ही सुटच नागरिकांच्या मुळावर येत असल्याचे चित्र आहे. गेली तीन महिने अलिप्त असलेल्या कंधारला आता कोरोनाची लागण होत आहे.


राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. आता ग्रामिण भागातही या विषाणूने आपली पकड घट्ट करायला सुरवात केली आहे. कंधार तालुक्यातील चिखलभोसी, सोनमाळतांडा, मोहिजा, यासह शहरात कोरोनाने यापूर्वी एन्ट्री केली होती. शुक्रवारी मोहजा येथे तीन आणि उस्माननगर येथे एकाला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून आता पर्यंत ११ जण या भयानक रोगाच्या कचाट्यात सापडले आहेत. कोरोनाचा पादुर्भाव झपाट्याने होत असल्याने शहर व परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे.

नांदेड व लोहा येथील डॉक्टरच्या संपर्कात आल्याने कंधार शहरात व तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. कंधार शहरात -एक, ग्रामीण भागातील चिखलभोसी -चार, सोनमाळ तांडा-एक, मोहिजा-एक असे सात जण कोरोना बाधित होते. यात शुक्रवारी (ता.तीन) अजून भर पडली. मोहिजा- तीन आणि उस्माननगर- एक अशा चार रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तीन महिने अलिप्त असलेल्या कंधारमध्ये तीन महिन्यानंतर ११ जणांना कोरोनाची बाधा झाली. रुग्णांच्या संख्येत वरचेवर वाढ होत असल्याने नगरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या २१ जणांच्या स्वॅब नमुन्याच्या अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


जनता संचारबंदी आणि आखाडी 
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नगरपालिकेने शनिवारपासून तीन दिवस जनता संचारबंदीची घोषणा केली होती. याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. शनिवारी आखाडी होती. आखाडीला आंब्याला मागणी असते. परंतु संचारबंदीत आखाडी आल्याने नागरिकांना आंबा मिळाला नाही. आंबा व्यापाऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले.

loading image
go to top