esakal | दिव्यांगाच्या विविध योजनांसाठी ‘दिव्यांग मित्र अप’ची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात या ॲपचे ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी (ता. सहा जून)  झाले.

दिव्यांगाच्या विविध योजनांसाठी ‘दिव्यांग मित्र अप’ची निर्मिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड - समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे दिव्यांगापर्यंत पोहचविण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘दिव्यांग मित्र अप’ ची मोलाची मदत होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. सहा जून) व्यक्त केला. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात या अपचे ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती रामराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अभिनव गोयल, आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा - Good News : दुष्काळी अनुदानाचे १ कोटी १७ लाख जमा 

दिव्यांग ॲपमध्ये ही आहे माहिती
या दिव्यांग मित्र ॲपमध्ये दिव्यांग व्यक्तींना आपली नोंदणी करुन विविध योजनांची माहिती त्यांना घेता येणार आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती या अपवरुन मिळणार आहे. शासनाकडून पाठविण्यात आलेल्या सूचना अथवा संदेश या अप’द्वारे पाहता येतील. दिव्यांगानी या अप’द्वारे सोप्या पध्दतीने आपली नोंदणी करुन स्वत:चे नाव, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांकासह इतर माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती नोंदणी झाल्यावर ती डॅशबोर्डवर दिसते. यामध्ये आर्थिक, वैयक्तिक माहिती, स्वत:ची कागदपत्रांच्या माहितीची नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्ण माहिती भरल्यानंतर समाजकल्याण अधिकारी सदर माहिती पडताळणी करुन अप्रु करतात. दिव्यांग व्यक्तीची डॅशबोर्डवरुन बँकेची, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी माहिती घेतली जाते.

हेही वाचलेच पाहिजे - नावात ‘गांधी’ असूनही गांधीनगरवर अन्याय... 

शासनाकडून दिली जाऊ शकते मदत
दिव्यांग मित्र अपद्वारे अगदी सोप्या पद्धतीने स्वत:चे सेल्फी छायाचित्र, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, वयाचा दाखला आदि माहिती भरता येणे शक्य आहे. या अपद्वारे विविध योजनेची अंतर्गत मदत शासनाकडून दिली जाऊ शकते. जिल्हा परिषदेकडून दिव्यांग व्यक्तीला अपच्या माध्यमातून दिव्यांग यादी, मदतीची विनंती यादी, शासकीय योजनेची यादी डॅशबोर्डवर पाहता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

loading image
go to top