Nanded : गन पाँईटवर दरोडा ; बारा लाखाची रक्कम लुटली crime news Nanded Robbery police team tasked with joint investigation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nanded : गन पाँईटवर दरोडा ; बारा लाखाची रक्कम लुटली

नायगाव : खाद्य तेलाची वसुली करुन नांदेडला जाणारी कार दोन मोटारसायकलवर आलेल्या सहा तरुणांनी तहसील कार्यालयाजवळ मंगळवारी रात्री ८.३० च्या दरम्यान अडवली. अगोदर वाद घातला नंतर गाडीच्या काचा फोडल्या व चालकाच्या डोक्याला बंदूक लावून १२ लाखाची रोकड लुटली.या धाडसी दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली असून. घटनेची माहिती मिळताच नायगाव, कुंटूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी धाव घेतले असून. दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती पण काहीही उपयोग झाला नाही.

नांदेड येथील खाद्य तेलाचे व्यापारी रत्नाकर पारसेवार यांचे मुनीम युवराज निवळे व चालक अंकुश खुजडे हे एम एच २६ बी एक्स ३८४९ या क्रमाकांची कार घेवून नायगाव नरसी व मुखेड येथे वसूलीसाठी गेले होते. ११ ते १२ लाखाची वसूली करुन रात्री नांदेडकडे जात असतांना नायगाव तहसील कार्यालयाजावळ पाठीमागून दोन मोटारसायकलवर आलेल्या सहा तरुणांनी कार अडवून तु आम्हाला कट का मारलास असा चालकाशी वाद घातला. त्यानंतर गाडीच्या काचा फोडल्या व चालकाच्या डोक्याला बंदूक लावली व मुनीम युवराज निवळे यांच्या हातातून रोख ११ लाख ८० रुपये असलेली बँग हिसकावून घेवून गेले.

चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने दरोडा घालून दरोडेखोर काही क्षणात आल्यापावली परत गेले. दर मंगळवारी पारसेवार यांचे मुनीम या मार्गावर वसुलीसाठी येतात. याचा पता ठेवून दरोडेखोरांनी नायगाव मार्गे पाठलाग केला रक्कम लुटल्यानंतर परत नायगाव शहराकडेच गेले. यामुळे एकच खळबळ उडाली असून चालक अंकुश खुजडे व मुनीम निवळे घाबरलेल्या अवस्थेत असतांनाच नायगाव व कुंटूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

या घटनेची माहिती समजताच देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारीही घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचीही टिम घटनास्थळी आली. सदरील दरोड्याचा संयुक्त तपास करण्याच्या कामाला पोलीस यंत्रणा लागली असून. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरोड्याच्या घटनेने खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी पेट्रोल पंप व नायगाव शहरातील महामार्गावरील सी सी टिव्ही फुटेज तपासण्याचे काम रात्रीच सुरु केले आहे.